शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईचा भार मात्र दातृत्वाचा आधार ट्युबवेलद्वारे पाणी : वाणी कुटुंबीयांनी दिले गावाला पाणी

By admin | Updated: March 29, 2016 00:24 IST

शिरसोली - अत्यल्प झालेल्या पावसामुळे शिरसोली गावाला पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. पाणी टंचाईचा भार ग्रामस्थ सहन करीत असताना गावातीलच काही नागरिकांनी आपल्या शेतातील विहीर तसेच स्वखर्चाने केलेले बोअरवेल नागरिकांसाठी खुले केले आहे. नागरिकांच्या या दातृत्त्वामुळे शिरसोलीकरांना किंचित आधार मिळत आहे.

शिरसोली - अत्यल्प झालेल्या पावसामुळे शिरसोली गावाला पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. पाणी टंचाईचा भार ग्रामस्थ सहन करीत असताना गावातीलच काही नागरिकांनी आपल्या शेतातील विहीर तसेच स्वखर्चाने केलेले बोअरवेल नागरिकांसाठी खुले केले आहे. नागरिकांच्या या दातृत्त्वामुळे शिरसोलीकरांना किंचित आधार मिळत आहे.
महिन्यातून एक वेळा पाणी
गिरणा नदीचे पाण्याचे आवर्तन दापोरा बंधार्‍यापर्यंत न आल्याने शिरसोली, म्हसावद, दापोरा, मोहाडी या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. शिरसोली प्र.न. या गावात महिन्यातून एक वेळा पाणी येत आहे. तर शिरसोली प्र.बो. या गावात १५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. एप्रिल व मे महिन्यात भीषण पाणी टंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीतर्फे पाण्याचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

वाणी यांनी गावासाठी दिले पाणी
पाण्याचे स्त्रोत संपले असताना शिरसोली येथील रहिवासी दिलीप अनंत वाणी यांनी आपल्या शेतातील विहिरीतून पाणी देण्याची तयारी दर्शविली आहे.त्यानुसार वाणी यांच्या शेतातील विहिरीचे पाणी हे ग्रामपंचायतीच्या विहिरीत सोडण्यात येत आहे.

बोरींगद्वारे देताहेत मोफत पाणी
दिलीप वाणी यांच्यासोबतच शिरसोली गावातील पूनमचंद मराठे (चव्हाण, अशफाक पिंजारी, दयाराम धामणे, मुस्तक पिंजारी, रामकृष्ण जगन्नाथ ताडे, शिरसोली प्र.बो. व शिरसोली प्र.न. येथील बारी पंच मंडळातर्फे स्वखर्चाने केलेल्या बोरींगद्वारे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

युवाशक्ती फाउंडेशनची मदत
जळगाव येथील युवाशक्ती फाउंडेशनतर्फे पारंपरिक होळी किंवा रेन डान्सचा उपक्रम यावर्षी साजरा न करता तीन टँकर पाणी हे शिरसोली गावात वाटप करण्यात आले. युवाशक्तीतर्फे प्रत्येक रविवारी तीन टँकर पाणी देण्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे. चंगळवादाकडे झुकत असलेल्या आजची पिढी ही समाजाच्या व्यथा आणि गरजांबाबत जागृत राहून मदतीसाठी पुढाकार घेत असल्याबाबत शिरसोली ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
(वार्ताहर)