शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतून कर्नाटकला सोडलेले पाणी उद्यापासून बंद

By admin | Updated: April 29, 2016 03:01 IST

कोयना धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर आणखी एक टीएमसी पाण्याची मागणी कर्नाटकने केली आहे.

सदानंद औंधे,

मिरज-कोयना धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर आणखी एक टीएमसी पाण्याची मागणी कर्नाटकने केली आहे. मात्र, राज्य शासनाने आणखी पाणी सोडण्याबाबत असमर्थता दर्शवून अक्कलकोटला पाणी सोडण्याची मागणी केली आहे. उद्या, शनिवारपासून कोयनेतून कर्नाटकसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येणार आहे. कर्नाटक सीमाभागात तीव्र पाणीटंचाई असल्याने बुधवारपासून कोयना व वारणा धरणांतून एक टीएमसी पाणी सोडले. कर्नाटकातील जमखंडीजवळ हिप्परगी धरणापर्यंत हे पाणी पोहोचले. राजापूर बंधाऱ्यातून ६०० एमसीएफटी पाणी कर्नाटकात गेले असून, उद्यापर्यंत एक टीएमसी पाणी कर्नाटकात पोहोचणार असल्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले. हिप्परगी धरणात आणखी एक टीएमसी पाणी सोडावे यासाठी कर्नाटकच्या शिष्टमंडळाने मुंबईत तळ ठोकला आहे. परंतु वेळेत पाऊस पडला नाही, तर पाणी आवश्यक असल्याने कर्नाटकला आणखी पाणी देण्यास जलसंपदा विभागाने असमर्थता दर्शविली आहे. देवाण-घेवाण करणारकर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगावसह अन्य दुष्काळी भागाचा दौरा करून पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी यापुढे दरवर्षी महाराष्ट्रासोबत चार टीएमसी पाण्याची देवाण-घेवाण करू, असे जाहीर केले. गुरुवारी बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी उगार येथे पाहणी करून महाराष्ट्रातून आणखी पाणी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले.