शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांची मालकी आता पाणीपुरवठा विभागाकडे * आरोग्य विभागाचे पंख छाटले * १ जानेवारीपासून ३४ जिल्हा अन् १४८ उपविभागिय प्रयोगशाळा येणार

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

नारायण जाधव

नारायण जाधव
ठाणे- आधीच पाणीटंचाईने होरपळणार्‍या महाराष्ट्रातील हजारो गावांत पिण्याचे पाणी दूषीत आढळले आहे़ ज्या गावांतील पाणीनुमने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळांत पाठविण्यात येतात, त्याचे अहवाल संबधित आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असणार्‍या पाणी गुणवत्ता तपाससी प्रयोगशाळांमधून उशिरा येऊ लागल्याने पाणीपुरवठा विभागास उपाययोजना करणे कठीण झाले आहे़ याबाबत सर्वत्र टीकेचा सूर निघू लागल्याने या प्रयोगशाळांसह तेथील कंत्राटी कामगार आणि साधनसामग्री पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रणासाखाली आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ राज्यात ३४ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, १३८ उपविभागिय प्रयोगशाळा असून आणखी १० उपविभागिय प्रयोगशाळांचे काम प्रगतीपथावर आहे़ यासर्वांचा कारभार १ जानेवारी २०१५ पासून आता आरोग्य विभागाकडून पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली येणार आहे़
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्राकडून मिळणार्‍या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी या प्रयोगशाळांवर खर्च करण्यात येतो़ दरवर्षी हा निधी पाणीपुरवठा विभाग नित्यनियमाने आरोग्य विभागाकडे सुपूर्द करतो़ आपल्या ग्रामीण रूग्णालयांच्या आवारात असलेल्या प्रयोगशाळांवर आरोग्य विभाग तो खर्च करतो़ परंतु, पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागात योग्य तो समन्वय राखला जात असल्याने राज्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरविणे पाणीपुरवठा विभागास कठीण होऊन बसले आहे़ आरोग्य विभागाकडून होणार्‍या दिरंगाईसह विषबाधेच्या घटनांमुळे पाणीपुरवठा विभागास टीकेचे धनी व्हावे लागत आहे़ कारण राज्यात हजारो गावांत पाणीटंचाई असून अनेक ठिकाणी विहीरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खोलवर गेली आहे़ त्यामुळे तेथील पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही, हे तपासण्याची जबाबदारी पाणीपुरवठाकडे आहे़ या विभागाचे कर्मचारी अधूनमधून गावांगावातील पिण्याचे पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांमध्ये पाठवितात़ शिवाय वाढत्या औद्योगिकरण आणि नागरीकरणामुळेही राज्यातील नद्या, तलावांसह इतर जलसाठे प्रदूषित झाले आहेत़ त्यांचे पाणी तपासण्याची जबाबदारीही पाणीपुरवठा विभाग या प्रयोगशाळांच्या माध्यमातून करतो़ अलिकडच्या काळात विभागाने राज्यातील अनेक प्रयोगशाळांचे बळकटीकरण केले आहे़ काहींचे काम प्रगतीपथावर आहे़ यावर कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येत आहेत़ मात्र, तरीही आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा विभागात या प्रयोगशाळांतच्या बाबतीत योग्य समन्वय राखून त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जात नाही़ यामुळे सर्व पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांसह तेथील रसायनी व डाटा एंट्री ऑपरेटर सारखे कंत्राटी मनुष्यबळ व साधनसामग्री १ जानेवारी २०१५ पासून एकाच छत्राखाली आणून पाणीपुरवठा विभागाच्या अखात्यारीत आणण्यात येणार आहे़