शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

शहर कार्यकारणीत तुर्तास नाही बदल : मोहन प्रकाश यांचे संकेत

शहर कार्यकारणीत तुर्तास नाही बदल : मोहन प्रकाश यांचे संकेत
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहर कार्यकारणीत बदल करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे इच्छुकांकडून शहराध्यक्षपदासाठी मुंबईला लॉबींग सुरू आहे. मात्र, शहर कार्यकारणीत तुर्तास कोणतेही बदल होणार नसल्याचे संकेत काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश यांनी बुधवारी दिले. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला.
शहरातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यावेळी शहराध्यक्ष ॲड. अभय छाजेड यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी घेवून राजीनामा दिला होता. परंतु, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी छाजेड यांचा राजीनामा स्वीकारला नाही. मात्र, प्रदेशाध्यक्षपदी दोन महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा शहराध्यक्ष व शहर कार्यकारणीत बदल करण्याची चर्चा सुरू झाली.
खुद्द अशोक चव्हाण यांनी एक महिन्यांत बैठक घेवून शहरातील कार्यकारणीत फेरबदल करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे गेल्या महिन्यांभरात शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी चव्हाण व मोहन प्रकाश यांना समर्थकांसह भेटून लॉबींग सुरू केले होते. शहर काँग्रेसतर्फे आयोजित राजीव गांधी जीवन दर्शन छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मोहन प्रकाश बुधवारी पुण्यात आले होते. त्यावेळी शहराध्यक्षपदासाठी इच्छुक माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, उपमहापौर आबा बागुल, नगरसेवक संजय बालगुडे, मुख्तार शेख, संगिता देवकर, निता रजपूत आदी मोहन प्रकाश यांच्या स्वागतासाठी मोठ्या अपेक्षेने उपस्थित होते. मात्र, शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कोणताही बैठक न घेता मोहन प्रकाश हे तातडीने कोल्हापूरला कार्यक्रमासाठी रवाना झाले. तसेच, पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी तुर्तास कोणतीही बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी पडल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
-----------------------