शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

पाणीपातळी अडीच मीटरने घटली १०९ विहिरींचे निरीक्षण : औसा तालुक्यात १०.२१ मीटरची पाणीपातळी लातूर : यंदाचा उन्हाळा तीव्र पाणीटंचाईचा असून, गेल्या पाच वर्षांत

By admin | Updated: February 9, 2015 00:44 IST

भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी जिल्‘ातील १०९ विहिरींचे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निरीक्षण केले असून, या निरीक्षणात ८.१८ मीटरवर पाणीपातळी असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील पाच वर्षांत याच विहिरींची पाणीपातळी ५.६३ मीटर होती. गतवर्षीच्या तुलनेत ५.५५ मीटर्सची घट निरीक्षणाअंती समोर आली आहे. अहमदपूर तालुक्यात १५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, या विहिरीतील पाणीपातळी मागील पाच वर्षांत ५.४७ होती. आता ७.७४ वर गेली आहे. २.२७ मीटरची घट आहे. तर औसा तालुक्यातही १५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत या विहिरींची पाणीपातळी ७.२३ होती. आता १०.२१ असून, २.९८ ची घट आहे. चाकूर तालुक्यात ७ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ५.१० मीटर पाणीपातळी होती. आता ७.३३ वर आहे. २.२३ मीटरची घट असल्याचे निदर्श

भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी जिल्‘ातील १०९ विहिरींचे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निरीक्षण केले असून, या निरीक्षणात ८.१८ मीटरवर पाणीपातळी असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील पाच वर्षांत याच विहिरींची पाणीपातळी ५.६३ मीटर होती. गतवर्षीच्या तुलनेत ५.५५ मीटर्सची घट निरीक्षणाअंती समोर आली आहे. अहमदपूर तालुक्यात १५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, या विहिरीतील पाणीपातळी मागील पाच वर्षांत ५.४७ होती. आता ७.७४ वर गेली आहे. २.२७ मीटरची घट आहे. तर औसा तालुक्यातही १५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत या विहिरींची पाणीपातळी ७.२३ होती. आता १०.२१ असून, २.९८ ची घट आहे. चाकूर तालुक्यात ७ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ५.१० मीटर पाणीपातळी होती. आता ७.३३ वर आहे. २.२३ मीटरची घट असल्याचे निदर्शनास आले आहे. लातूर तालुक्यात १८ विंधन विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ५.३६ मीटर पाणीपातळी होती. आता ७.६२ असून, २.२६ ची घट आहे. निलंगा तालुक्यात १७ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ६.८२ मीटर पाणीपातळी होती. आता ९.३३ वर आहे. २.५१ मीटरची घट आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात ५ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ६.२८ मीटर पाणीपातळी होती. आता ९.२० मीटर असून, २.९२ मीटरची घट आहे. रेणापूर तालुक्यात ११ विंधन विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. मागील पाच वर्षांत या विहिरींची पाणीपातळी ५.१८ मीटर होती. आता ४.४८ मीटर असून, २.३० ची घट आहे. उदगीर तालुक्यात ९ विंधन विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ५.५३ मीटर पाणीपातळी होती. आता ७.३७ मीटर असून, २.१४ ची घट आहे. जळकोट तालुक्यात ४ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ५.४५ मीटर पाणीपातळी होती. आता ९.७३ आहे. ४.२८ मीटरची घट आहे. देवणी तालुक्यात ८ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असून, मागील पाच वर्षांत ३.८५ मीटर पाणीपातळी होती. आता ५.४४ असून, १.५९ मीटरची घट आहे. जिल्‘ात १०९ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. मागील पाच वर्षांत या विहिरींची पाणीपातळी ५.६३ मीटर होती. आता ८.१८ मीटर असून, २.५५ मीटरचीघटआहे.