शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका बसविणार शाळा व रुग्णालयांत हवेतून पाणी काढणारे मशिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2015 23:22 IST

महापालिका बसविणार शाळा व रुग्णालयांत हवेतून पाणी काढणारे मशिनहवेतले पाणी महाग : विरोधी पक्षाकडून विरोधमुंबई :मुंबईतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या योजना अपयशी ठरल्यानंतर महापालिका आता हवेतील आद्रता शोषून पाणी निर्माण करण्याचा प्रयोग करणार आहे. या मशिन पालिका रुग्णालये व शाळांत उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. हा पाणी प्रकल्प महापालिकेला ...


महापालिका बसविणार शाळा व रुग्णालयांत हवेतून पाणी काढणारे मशिन
हवेतले पाणी महाग : विरोधी पक्षाकडून विरोध
मुंबई :
मुंबईतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या योजना अपयशी ठरल्यानंतर महापालिका आता हवेतील आद्रता शोषून पाणी निर्माण करण्याचा प्रयोग करणार आहे. या मशिन पालिका रुग्णालये व शाळांत उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. हा पाणी प्रकल्प महापालिकेला प्रचंड महागडा ठरणार असल्याने विरोधी पक्षनेत्यांनी याला विरोध केला आहे.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी विविध कल्पना समोर आणत आहे. मुंबईतील पाणी टंचाई दूर होत नसल्याने पालिकेने मशीनमार्फत पाण्याचा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. स्काय वॉटर व एअर वॉटर या दोन कंपन्यांनी गटनेत्यांच्या बैठकीत या प्रकल्पाचे नुकतेच सादरीकरण केले. त्यानुसार एक लिटर पाणी निर्माण होण्यासाठी १ रुपया २५ पैसे ते दीड रुपये असा पाण्याचा दर असणार आहे. हा संपूर्ण खर्च पालिका उचलणार आहे. मुंबईला पुरविण्यात येणार्‍या पाण्यासाठी सध्या एक हजार लिटरसाठी ४ रुपये २५ पैसे खर्च येतो. त्यापेक्षा हवेतील पाण्याचा खर्च जास्त असताना तो पालिकेला परवडणार कसा हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोधकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.