शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- थरारक! ...अन् वाहून गेलेल्या रस्त्यावर लोखंडी पाइप टाकून त्यानं चालवली गाडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 15:55 IST

गेल्या आठवड्याभरापासून हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे.

शिमलाः गेल्या आठवड्याभरापासून हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि रस्ते वाहून जाण्यासारखे प्रकार घडले आहेत. हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यातील ड्रेकरी भागात 22 ऑगस्ट रोजी रस्ता वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ड्रेकरी या भागातला रस्ता मध्येच वाहून गेल्यानं मोठा खड्डा पडला असून, वाहन चालकांनीही त्याच रस्त्यावरून पलिकडे जाण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.काही वाहन चालकांनी वाहून गेलेल्या दोन्ही रस्त्यांना जोडण्यासाठी लोखंडाचे पाईप टाकले असून, या लोखंडाच्या पाइपावरूनच कार दामटताना हे वाहन चालक दिसत आहेत. 28 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये वाहन चालक जीवाशी खेळ करून कशा प्रकारे वाहन लोखंडाच्या पाइपावरून पलिकडे नेत आहेत हे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये चालक गाडी चालवत असून, एक जण त्याला गाडी त्या लोखंडी पाइपावरून नेण्यासाठी मार्गदर्शन करताना दिसत आहे. गाडीची पार्किंग लाइट सुरू असून, वाहन चालक हळूहळू ती कार त्या पाइपावरून पलिकडे नेत आहे. हा व्हिडीओ एएनआयनं ट्विट केला असून, त्यावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आम्ही या चित्तथरारक कसरतीनं अजिबात प्रभावित झालेलो नाही, खरं तर हा मूर्खपणा आहे, असं एका युजर्सनं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजर्सनं म्हटलं आहे की, जुगाड करण्यासाठीही काही मर्यादा असतात, हा शुद्ध मूर्खपणा आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश