शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

'विनातिकीट प्रवाशांना दंडाऎवजी रेल्वेतच तिकीट' ही निव्वळ अफवा

By admin | Updated: September 6, 2016 22:06 IST

रेल्वेने विनातिकीट प्रवास करणा-यांना रेल्वेतच तिकीट मिळण्याची सोय उपलब्ध करून दिल्याची बातमी ही अफवा आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 6- रेल्वेने विनातिकीट प्रवास करणा-यांना रेल्वेतच तिकीट मिळण्याची सोय उपलब्ध करून दिल्याची बातमी ही अफवा आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अशा प्रकारची कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे तुम्ही विनातिकीट रेल्वेतून प्रवास केल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.

सुपरफास्ट रेल्वेमध्ये टीसींकडे अशा प्रकारचं कोणतंही तिकीट मशीन देण्यात आलं नाही. त्यामुळे टीसी तुम्हाला ट्रेनमध्ये कोणतंही तिकीट न देता थेट दंड आकारू शकतो. काही वृत्तपत्रांनी 'रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणा-यांना द्यावा लागणार नाही दंड' या मथळ्याखाली बातमी छापून प्रवाशांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रवाशांनी अशा प्रकारच्या कोणत्याही वृत्तावर विश्वास न ठेवता अशा अफवांपासून शक्यतो दूर राहावे आणि तिकीट काढूनच रेल्वेतून प्रवास करावा.

रेल्वेचे पीआरओ विभागाचे अतिरिक्त महासंचालक अनिल सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही निर्णयाची घोषणा केली नाही. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच काही वृत्तपत्रांनी लखनऊ मेल, गरीब रथ, अर्चना सुपरफास्ट, राजधानी सुपरफास्ट या रेल्वेमध्ये टीसींना हँड-हेल्ड मशीन देण्यात आल्याचंही वृत्त दिलं होतं. मात्र तशा प्रकारचं कोणतंही मशीन टीसींना देण्यात आलं नाही, अशी माहिती अनिल सक्सेना यांनी दिली आहे. त्यामुळे वाचकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.