गणेशनगर परिसरात कंपनीचे सांडपाणी
By admin | Updated: December 14, 2015 19:54 IST
सातपूर (वार्ताहर) : कारखान्यातून बाहेर पडणार्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे गणेशनगर येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर सांडपाणी बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
गणेशनगर परिसरात कंपनीचे सांडपाणी
सातपूर (वार्ताहर) : कारखान्यातून बाहेर पडणार्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे गणेशनगर येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर सांडपाणी बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. प्रभाग क्र . २१ मधील गणेशनगर वसाहतीलगत असलेल्या प्रिसिजन फोर्जिंग ॲण्ड स्टॅम्पिंग कंपनीने कंपनीतील दुर्गंधीयुक्त सांडपाणी संरक्षक भिंतीला छिद्र पाडून बाहेर रस्त्यावर सोडून दिले आहे. शौचालयातील या सांडपाण्यामुळे गणेशनगर परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांचा त्रास वाढला आहे. बाजूला खासगी रु ग्णालय असल्याने रु ग्णांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्रभागाचे नगरसेवक उषा अहिरे यांचेकडे तक्र ार केली असता नगरसेवकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रिसिजन फोर्जिंग कंपनीला नोटीस बजावली आहे. एवढे होऊनही काहीही उपयोग झालेला नाही. आता संबंधित कंपनी आणि महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दीपाली राऊळ, संध्या सदगुणे, लता मते, डॉ. अनिल बेंडाळे, कल्पना जाधव, सुमन पवार, डॉ. स्वप्नील लुंकड, राजेंद्र शिंदे, स्वप्नील घुमरे, अरविंद गोंगे, दिनेश राऊळ, बाळासाहेब पाटील, तुकाराम सावळा, प्रशात सिंधीकर, प्रशांत भामरे आदिंसह नागरिकांनी दिला आहे.--इन्फो-- प्रिसिजन फोर्जिंग अँड स्टॅम्पिंग कंपनीने नागरी वसाहतीत कंपनीचे सांडपाणी सोडू नये म्हणून मागील वर्षी चार हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली होती. तरीही सांडपाणी सोडण्यात येत असल्याच्या नागरिकांच्या तक्र ारीची दखल घेऊन ४ नोव्हेंबर रोजी मनपाने नोटीस बजावली होती. तरीही कंपनी मालक ऐकत नसल्याने सोमवारी ( दि.१४) रोजी पुन्हा नोटीस बजविण्यात आली आहे. कंपनी व्यवस्थापनाने सांडपाणी बंद करण्यासाठी काही दिवसांची मुदत मागून घेतली आहे.- संजय गांगुर्डे, विभागीय स्वच्छता निरीक्षक, सातपूर विभाग--इन्फो-- दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे हैराण झालेल्या गणेशनगरमधील रहिवाशांच्या तक्र ारी आरोग्य विभागाकडे सोपविल्या होत्या. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले असून आता आरोग्य अधिकारी व महापालिका आयुक्त यांनीच लक्ष घालून संबंधित कंपनी मालकावर योग्य ती कारवाई करावी आणि रहिवाशांना दिलासा द्यावा. - विक्र ांत मते, उषा अहिरे, नगरसेवक, प्रभाग क्र मांक २१फोटो : १४ सातपूर सांडपाणी नावाने सेव्ह आहे.