शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू राष्ट्रवादामुळे युद्धजन्य परिस्थिती; चीनचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:37 IST

भारतात हिंदू राष्ट्रवाद वाढत असून, त्यामुळे चीन व भारत यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून

बीजिंग : भारतात हिंदू राष्ट्रवाद वाढत असून, त्यामुळे चीन व भारत यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्लोबल टाइम्स, अन्य सरकारी वृत्तपत्रे तसेच सरकारच्या मालकीच्या टीव्ही चॅनलमधून भारतावर सतत टीका केली जात आहे आणि त्यामार्गे भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारात हिंदू राष्ट्रवादाचा इंधन म्हणून वापर केला असून, ते सत्तेत आल्यापासून भारतात मुस्लिमांवरील हिंसाचाराच्या घटनांत वाढ झाली आहे, असे नमूद करीत हिंदू राष्ट्रवाद वाढल्यानेच भारत व चीन यांच्यात युद्धाची शक्यता बळावली आहे, असे ग्लोबल टाइम्समधील लेखात म्हटले आहे. हिंदू राष्ट्रवादामुळे भारताची युद्धाकडे वाटचाल सुरू आहे. राजधघनी दिल्लीतील परराष्ट्रविषयक सल्लागार, नेते व रणनीती आखणारे चीनविषयीचे भारताचे धोरण बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. पण चीनच्या तुलनेत भारताचे सामर्थ्य खूपच कमी आहे, असा उल्लेख लेखात आहे. डोकलाममधून भारताने आपले लष्कर मागे घ्यावे, असे चीन सातत्याने भारताला सांगत आहे. तरीही आपल्या सैन्याला माघारी न बोलावण्यास भारताची हीच रणनीती कारणीभूत आहे, असा आरोप या लेखात करण्यात आला आहे. तिबेटची मदत सुरू राहू द्यालोकशाही आणि मानवाधिकार टिकवून ठेवण्यासाठी त्या देशाला चीनचा भाग असलेल्या तिबेटला पूर्वीप्रमाणे अर्थसाह्य करण्यात यावे, असे मत तेथील डेमॉक्रेटिक पार्टीच्या सदस्यांनीही व्यक्त केले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे साह्य न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्या पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलॉसी यांनी चिंता व्यक्त केली आहे.माघार हाच मार्गडोकलाममधून आपले सैनिक मागे घेणे हाच एकमेव मार्ग भारतापुढे आहे. अन्यथा त्या सैनिकांना ताब्यात घेतले जाईल वा ते मारले जातील, असे चीनचे भारतातील माजी वाणिज्यदूत लियो युवफा यांनी म्हटले आहे. युवफा हे मुंबई वाणिज्य कार्यालयात होते.मला जो आंतरराष्ट्रीय कायदा समजतो, त्याप्रमाणे लष्करी वेषातील व्यक्ती अन्य राष्ट्राच्या सीमेत घुसते, तेव्हा त्या व्यक्तीस शत्रू मानून ताब्यात घेतले जाते वा मारले जाते. त्यामुळे अशा स्थितीत माघार घेणे हाच मार्ग असतो, असे त्यांनी म्हटले आहे.अमेरिकेची टीकावॉशिंग्टन : सतत कुरापती काढण्याची सवय असलेल्या चीनच्या सध्याच्या विस्तारवादी भूमिकेवर अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीच्या संसद सदस्यांनी टीका केली आहे. अन्य राष्ट्रांच्या सीमांबाबतही चीन वाद निर्माण करीत आहे, याचा उल्लेख त्यांनी केला आहे.