शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हे तर शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्ध

By admin | Updated: June 6, 2017 23:16 IST

महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन यामुळे देशातील वातावरण तापलेले आहे. त्यातच

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 -  महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन यामुळे देशातील वातावरण तापलेले आहे. त्यातच मध्य प्रदेशात मंदासौर जिल्हात काल आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर  पोलिसांना गोळीबार केला. या गोळीबारात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने परिस्थिती अधिकच बिघडली असून, शेतकऱ्यांवर केलेला गोळीबार म्हणजे सरकारने शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्धच आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे.  मध्य प्रदेशातील मंदसौरच्या पार्श्वनाथ येथे सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू  झाला होता. दोन जूनपासून मंदसौरमध्ये शेतक-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनादरम्यान, येथील पार्श्वनाथमध्ये काही आंदोलकांकडून वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. यावेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी सीआरपीएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात संघर्ष सुरु झाला. यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार शेतकरी जखमी झाले असून पाच शेतक-यांचा मृत्यू झाल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या गोळीबाराचा राहुल गांधी यांनी ट्विटरवरून निषेध केला आहे. हे सरकार आपल्याच देशातील शेतकऱ्यांविरोधात युद्ध पुकारत असल्याचे राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. राहुल यांच्याबरोबरच मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. अन्नदात्यावर गोळी चालवणे अत्यंत दु:खद आहे. आजचा दिवस मध्य प्रदेशच्या इतिहासातील काळा दिवस आहे, असे शिंदेंनी म्हटले आहे.