शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांविरुद्ध खटल्यासाठी मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 06:14 IST

केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) करून चार महिने उलटले तरी संबंधित सक्षम प्राधिका-यांकडून त्यासाठी अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) काही अधिकाऱ्यांसह केंद्र सरकारच्या सुमारे १०० अधिका-यांविरुद्ध खटले दाखल करण्याची शिफारस केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) करून चार महिने उलटले तरी संबंधित सक्षम प्राधिका-यांकडून त्यासाठी अद्याप मंजुरी मिळालेली नाही.विशेष म्हणजे खटले दाखल करण्याचे प्रस्तावित केलेल्या अधिका-यांमध्ये केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) व अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या अग्रगण्य तपासी यंत्रणेतील अधिका-यांचाही समावेश आहे. नियमानुसार केंद्र सरकारी अधिकाºयांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची ‘सीव्हीसी’ आधी छाननी करते व सकृतदर्शनी तथ्य दिसल्याने त्यांनी खटला दाखल करण्याची शिफारस केली तर संबंधित सक्षम प्राधिकाºयाने त्यासाठी चार महिन्यांत मंजुरी देणे अपेक्षित असते.‘सीव्हीसी’कडून दिलेल्या माहितीनुसार एकूण ५१ प्रकरणांमध्ये ९७ अधिकाºयांवर खटल्याची शिफारस करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक आठ प्रकरणे केंद्रीय कार्मिक विभाग व कॉर्पोरेशन बँकेकडे प्रलंबित आहेत. त्या खालोखाल सहा अधिकाºयांवरील खटल्यासाठी मंजुरीची उत्तर प्रदेश सरकारकडून प्रतीक्षा आहे.याखेरीज कॉम्प्ट्रोलर आणि आॅडिटर जनरल (कॅग), कोळसा मंत्रालय, कॅनरा बँक, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी, स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स, युनियन बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय, मानव संसाधन विकास मंत्रालय, जलसंसाधन मंत्रालय व लोकसभा सचिवालय यांच्या प्रत्येकी एका अधिकाºयावर खटला प्रस्तावित आहे.याचप्रमाणे दिल्ली, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ व तामिळनाडू या राज्यांच्या सरकारांनीही आपापल्या अधिकाºयांवरील खटल्यांना चार महिन्यांच्या मुदतीत मंजुरी दिलेली नाही.>कोणत्या खात्यातील आहेत अधिकारी?‘सीव्हीसी’च्या सूत्रांनी सांगितले की, कॉर्पोरेशन बँक, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स व मानव संसाधन विकास मंत्रालय यामधील २३ अधिकाºयांविरुद्ध खटल्यासाठी मंजुरीची गरज नाही, असे त्या संस्थांचे म्हणणे आहे. ‘सीव्हीसी’ने याच्याशी सहमतीसुद्धा दर्शविली आहे. मात्र, त्यानंतर या संस्थांनी अंतिम निर्णय काय घेतला, हे ‘सीव्हीसी’ला कळविलेले नाही.