शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

...यांना प्रतीक्षा पुन्हा वृक्षारोपणाची झाडे गायब, केवळ खड्डे बाकी : मेहरूण चौपाटी परिसरात दुर्लक्षाची परिसिमा

By admin | Updated: March 29, 2016 00:25 IST

जळगाव : दरवर्षी या मेहरूण तलाव परिसरात विविध संघटनांचे हौशी कार्यकर्ते वृक्षारोपण करतात पण त्यांच्या संगोपनाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे तीच जागा, तेच खड्डे आणि वृक्षारोपण करणार्‍या संघटनांही त्याच अशी प्रचिती येत असते. आताही मेहरूण चौपाटीवरील वृक्षारोपणाचे खड्डे आहे त्याच स्थितीत असून जणू त्यांनाही पुन्हा वृक्षारोपणाची प्रतीक्षा असल्याचेच या परिसरात दिसून येत आहे.

जळगाव : दरवर्षी या मेहरूण तलाव परिसरात विविध संघटनांचे हौशी कार्यकर्ते वृक्षारोपण करतात पण त्यांच्या संगोपनाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे तीच जागा, तेच खड्डे आणि वृक्षारोपण करणार्‍या संघटनांही त्याच अशी प्रचिती येत असते. आताही मेहरूण चौपाटीवरील वृक्षारोपणाचे खड्डे आहे त्याच स्थितीत असून जणू त्यांनाही पुन्हा वृक्षारोपणाची प्रतीक्षा असल्याचेच या परिसरात दिसून येत आहे.
पक्षांचा मोठा अधिवास लाभलेला, चोहोबाजुंनी निसर्गाचा वेढा असलेल्या मेहरूण तलाव परिसरास जैवविविधता वारसा हक्क स्थळ म्हणून दर्जा मिळावा म्हणून एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे त्याची दुरवस्था दिवसेंदिवस वाढतच असल्याची प्रचिती येत आहे.
प्रमुख पर्यटन स्थळ
शहरातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून मेहरूण तलावाची ओळख आहे. विस्तीर्ण परिसर, दाट वनराईमुळे या परिसरात पशुपक्ष्यांचाही मोठ्या प्रमाणात विहार असतो. ब्रिटीश कालीन म्हणजे शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधीपूर्वीचा हा तलाव असल्याचे जुन्या जानकार व्यक्तींकडून सांगिलते जाते. १९६९ मध्ये या भागातील वनराईत वाघाचा संचार होता असेही सांगितले जाते. तलावात अंबरझरा, मन्यारखेडा व मोहाडीकडून पाणी येते. मात्र काही बांधकामांमुळे येणार्‍या प्रवाहात बदल होऊन पाण्याची आवकही गेल्या काही वर्षात घटली आहे. तलावाचे एकूण क्षेत्रफळ ७६ हेक्टर एवढे आहे. तर पाच किलो मीटरची पेरीफेरी आहे. तलावाची साठवण क्षमता ९१.८४ दलघफु एवढी असल्याची नोंद महापालिकेकडे आहे.
विकासाकडे दुर्लक्ष
मेहरूण तलाव परिसर एक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत व्हावा यासाठी बर्‍याच वेळेस नियोजन झाले. विविध कामे या परिसरात प्रस्तावित आहेत. मात्र प्रत्यक्षात फारशी कामे या भागात होऊ शकलेली नाहीत. गणेशोत्सव, दुर्गोत्सव काळात तलावात मूर्त्यांचे विसर्जन करताना महापालिका, स्वयंसेवी संस्थांकडून विविध आवाहने केली जात असतात मात्र त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाहीत.
------