शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाघूर जलवाहिनीला चर्चजवळ गळती लाखो लीटर पाण्याची नासाडी: अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2016 18:26 IST

जळगाव: वाघूर मुख्य जलवाहिनीला रामानंदनगर रस्त्यावर चर्चजवळ रविवारी सकाळी अचानक गळती लागल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. दरम्यान दोन पाईपच्या जॉईंटवरील रिंग पाण्याच्या दाबामुळे सटकली असल्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे. रविवारी पाणीपुरवठा सुरळीत झाला असून सोमवारी ही गळती आपोआप थांबते का? याची पाहणी केल्यानंतर दुरूस्तीबाबत निर्णय घेता येईल.

जळगाव: वाघूर मुख्य जलवाहिनीला रामानंदनगर रस्त्यावर चर्चजवळ रविवारी सकाळी अचानक गळती लागल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. दरम्यान दोन पाईपच्या जॉईंटवरील रिंग पाण्याच्या दाबामुळे सटकली असल्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे. रविवारी पाणीपुरवठा सुरळीत झाला असून सोमवारी ही गळती आपोआप थांबते का? याची पाहणी केल्यानंतर दुरूस्तीबाबत निर्णय घेता येईल.
मनपाच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागण्याचे प्रकार सातत्याने सुरूच आहेत. पाण्याचा दबाव येत असल्याने गळती लागण्याचे प्रकार वारंवार होत असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे. त्यासाठी हवेचा दाब कमी करण्यासाठी एअर प्रेशर व्हॉल्वही बसविण्यात आले आहेत. तरीही गळती लागण्याचे प्रकार सुरूच आहेत. रविवारी सकाळी वाघूर जलवाहिनीला रामानंदनगर रस्त्यावर चर्चसमोर अचानक मोठी गळती लागली. बघणार्‍यांना जलवाहिनी फुटली, असाच भास झाला. लाखो लीटर पाणी वाया गेले.

नवीन बांधकामाच्या ठिकाणी शिरले पाणी
जलवाहिनीच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर वाहू लागले. गळती लागलेल्या ठिकाणा शेजारीच एक अपार्टमेंट असून त्यालगत नवीन बांधकाम सुरू आहे. हे पाणी नवीन बांधकामाच्या बेसमेंटमध्ये शिरले. तेथून पाझरून हे पाणी गळती लागलेल्या ठिकाणाशेजारच्या अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये शिरले. तेथील गटारीतून हे पाणी वाहताना दिसत होेते.

रिंग सटकल्याने गळती
याबाबत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी.एस. खडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यापूर्वीही दोन पाईपच्या जोडावरील रिंग पाण्याच्या दाबामुळे सटकल्याने गळती लागली होती. मात्र दुसर्‍या दिवशी पुन्हा रिंग जागेवर सरकल्याने गळती आपोआप बंद झाली होती. त्यामुळे सोमवारी पुन्हा गळती लागते की आपोआप बंद होते? याची पाहणी केली जाईल. मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असल्यास दुरुस्तीबाबत निर्णय घेतला जाईल. दरम्यान रविवारी मात्र सुरळीत पाणीपुरवठा झाल्याचे त्यांनी सांगितले.