शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार

By admin | Updated: July 17, 2017 20:50 IST

भाजपानं केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर केलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17- भाजपानं केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी व्यंकय्या नायडूंच्या नावाची घोषणा केली आहे. उद्या सकाळी 11 वाजता व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज भरतील, असंही अमित शाहांनी सांगितलं आहे. व्यंकय्या नायडू लहानपणापासूनच भारतीय जनता पक्षाचं काम करत आलेत, व्यंकय्या नायडूंना 25 वर्षांच्या संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. एनडीएच्या घटकपक्षांनीही व्यंकय्या नायडूंच्या नावाला सहमती दर्शवली आहे, असंही अमित शाहा म्हणाले आहेत. 

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय संसदीय मंत्री आणि दक्षिणेतला भाजपाचा मोठा चेहरा म्हणून एनडीएकडून व्यंकय्या नायडूंचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. दक्षिणेत भाजपाला मजबूत करण्यासाठी व्यंकय्या नायडूंना उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवल्याची चर्चा आहे.  व्यंकय्या नायडू हे संघाचे कार्यकर्ते आहेत. भाजपामध्ये त्यांच्याकडे ज्येष्ठ आणि जाणकार नेते म्हणून पाहिलं जातं. ब-याचदा भाजपा पक्ष अडचणीत सापडलेला असताना व्यंकय्या नायडू बचावासाठी पुढे येऊन पक्षाची बाजू भक्कमपणे मांडताना पाहायला मिळतात. त्याप्रमाणेच सर्वपक्षीयांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.

आणखी बातम्या वाचा
 
(‘रमेश कदमला मतदानास मुभा नाही’)