शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्रांवर खापर

By admin | Updated: March 16, 2017 00:34 IST

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षांच्या अनुक्रमे उत्तर प्रदेश व पंजाब विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे

लखनऊ/ नवी दिल्ली : बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षांच्या अनुक्रमे उत्तर प्रदेश व पंजाब विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर मतदान यंत्रांवर फोडले व या दोन्ही राज्यांत भारतीय जनता पार्टीने मतदान यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गडबड केल्याचा आरोप केला.लखनऊमध्ये पत्रकारांना मायावती म्हणाल्या की, भाजपाला मिळालेले यश हे ‘अप्रामाणिकपणा’ आणि ‘लबाडी’ने मिळाले आहे.भाजपाने मतदान यंत्रांमध्ये गडबड केल्याने प्रत्यक्षात आमच्या बाजूने पडलेली मते मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे वळविली गेली. मणिपूर व गोवा यासारख्या छोट्या राज्यांमध्येही गडबड केली असती तर बिंग फुटले असते. शिवाय उत्तर प्रदेशमध्ये जे केले त्याला उत्तर द्यायला जागा राहावी म्हणून भाजपाने इतर राज्यांमध्ये अशी लबाडी ेकली नाही, असा त्यांनी आरोप केला. मायावती म्हणाल्या की. मतमोजणी सुरू असातनाच आम्ही हा विषय निवडणूक आयोगाकडे नेला. पण आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आता याविरुद्ध न्यायालयातही दाद मागितली जाईल. लोकशाहीचा हा खून ११ तारखेला झालेला असल्याने बसपा प्रत्येक महिन्याच्या ११ तारखेला ‘काळ दिवस’ पाळेल आणि त्या दिवशी निषेध धरणे धरले जाईल. मावळत्या विधनसभेत ८०आमदार असलेल्या बसपाचे नव्या विधानसभेत फक्त १९ सदस्य निवडून आले आहेत.पराभवाने मानसिक संतुलन बिघडल्याने केजरीवाल अशी बडबड करत आहेत. पंजाबच्या मतदारांनी नाकारले हे त्यांनी मान्य करावे. दिल्लीत ७० पैकी ६७ जागा ‘आप’ला मिळाल्या तेव्हा केजरीवाल यांनी अशी तक्रार केली नव्हती. आरोप करण्याऐवजी केजरीवाल यांनी ‘विपस्यना’ करावी आणि दिल्लीच्या राज्य कारभाराकडे अधिक लक्ष द्यावे. - हरसिमरन कौर बादल, केंद्रीय मंत्री व अकाली दल नेत्याप्रत्येत राजकीय पक्ष पराभव झाल्यावर अशी तक्रार करत असतो व जिंकल्यावर तो गप्प बसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी नव्हे तर मतदारांच्या मनात कोणताही किंतू राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने सक्रियतेने व आक्रमकतेने मतदान यंत्रांविषयीच्या शंका-कुशंकांचे ठामपणे निरसन करायला हवे. शिवाय २०१९ च्या निवडणुकीत् मतदारांना मतदानाची लेखी पोचपावती देण्याचे वचन आयोगाने सर्वोच्च न्यायालयास दिले आहे. त्यासाठीही तयारी करावी.- एस. वाय. कुरेशी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त