बॅॅलेटने प्रत्युत्तर!
कडाक्याची थंडी आणि पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांची दहशत यास न जुमानता श्रीनगरपासून 95 किमी अंतरावरील उरी या सीमेवरील मतदारसंघातील मतदारांनी मंगळवारी उत्साहाने मतदान केले.
डोंगरवाटा चढून लोकशाहीला बळ
च्उरीमधील मोहराजवळील कंद्रवन गावात शुक्रवारी झालेल्या फिदायीनी हल्ल्यात सहा पाकिस्तानी अतिरेक्यांसह एकूण 17 जण ठार झाले होते.
च्मात्र या हल्ल्याने जराही न डगमगता मतदारांनी मतदान केंद्रे उघडताच मोठय़ा रांगा लावून मतदान केले. या वेळी अनेक मतदार दोन - तीन किमीची खडतर डोंगरवाट चालून मतदानासाठी आले होते.