मतदार नावनोंदणी व चुकीच्या दुरुस्तीची प्रक्रिया यापुढे अधिक सोपी मुख्य निवडणूक आयुक्तांचे आश्वासन
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
नवी दिल्ली- मतदार यादीत नावनोंदणी व चुकीच्या नोंदणीची दुरस्ती करण्याची प्रक्रिया यापुढे अधिक सुलभ करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्राा यांनी येथे केले. यात आयोगाचे उद्दिष्ट हे केवळ व्यापक भागीदारीचे नसून संपूर्ण भागीदारीचे राहणार आहे. तसेच सर्व योग्य व्यक्तींची नोंदणी करण्याचे आणि नोंदणीकृत मतदारांना मतदानाची सुविधा पुरविण्यावर पूर्ण भर देणार असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले.
मतदार नावनोंदणी व चुकीच्या दुरुस्तीची प्रक्रिया यापुढे अधिक सोपी मुख्य निवडणूक आयुक्तांचे आश्वासन
नवी दिल्ली- मतदार यादीत नावनोंदणी व चुकीच्या नोंदणीची दुरस्ती करण्याची प्रक्रिया यापुढे अधिक सुलभ करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा यांनी येथे केले. यात आयोगाचे उद्दिष्ट हे केवळ व्यापक भागीदारीचे नसून संपूर्ण भागीदारीचे राहणार आहे. तसेच सर्व योग्य व्यक्तींची नोंदणी करण्याचे आणि नोंदणीकृत मतदारांना मतदानाची सुविधा पुरविण्यावर पूर्ण भर देणार असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले. पाचव्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात त्यांनी या वर्षीच्या मतदार दिनाचा विषय हा सरळ नोंदणी व सरळ दुरुस्ती असा असल्याचे नमूद केले आहे. निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिनाच्या रूपात साजरा केला जात असतो. १९५० रोजी या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. या वर्षी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेत हा दिन साजरा करण्यात येत आहे.