शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वीरभद्र सिंह यांची याचिका फेटाळली

By admin | Updated: April 1, 2017 01:29 IST

बेहिशेबी संपत्तीचा (डीए) खटला रद्द करण्यात यावा ही हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि त्यांच्या पत्नीची

नवी दिल्ली : बेहिशेबी संपत्तीचा (डीए) खटला रद्द करण्यात यावा ही हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि त्यांच्या पत्नीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. केंद्रीय गुप्तचर खात्याने हा खटला दाखल केला आहे.न्या. विपिन संघी यांनी एक आॅक्टोबर २०१५ रोजीचा हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा हंगामी आदेशही रद्द केला. या हंगामी आदेशान्वये सीबीआयला न्यायालयाच्या परवानगीशिवाय या खटल्यात अटक करणे, चौकशी करणे किंवा आरोपपत्र दाखल करण्यास मनाई करण्यात आली होती. याचिका फेटाळण्यात आली असून स्थगनादेश रद्द करण्यात आला आहे, असे न्यायालयाने म्हटले. सीबीआयने मी आणि माझ्या पत्नीच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत आणि प्राथमिक चौकशीचे दप्तर व प्रथम माहिती अहवाल मागवून घ्यावा अशी विनंती वीरभद्र सिंह यांनी न्यायालयाला केली होती.वीरभद्र सिंह आणि पत्नी प्रतिभा सिंह यांनी दावा केला होता की सीबीआयला चौकशी करण्याचे, तपास करण्याचे किंवा नियमित खटल्यांची नोंदणी करण्यास आणि हिमाचल प्रदेशच्या प्रांतात न्यायालयाचे अधिकारक्षेत्र वापरण्याचा अधिकार देणारा आदेश, निर्देश किंवा निर्णय न्यायालयाने दिलेला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)आरोप खूपच गंभीरसीबीआयने केलेल्या युक्तिवादात सिंह यांच्यावरील आरोप ‘खूपच गंभीर’ आहेत कारण खूपच मोठा पैसा यात गुंतला असून त्यांना संरक्षण देण्यात राज्य सरकारने ‘जास्तीच काळजी’ दाखवली आहे, असे म्हटले. संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारमध्ये वीरभद्र सिंह केंद्रीय मंत्री असताना दिल्लीतून त्यांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे त्यामुळे दिल्लीत खटला दाखल करून त्याची चौकशी करण्याचे आमचे अधिकार क्षेत्र आहे, असेही सीबीआयने म्हटले.