शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

त्या भित्र्यांना पुरुष म्हणवण्याचा अधिकारी नाही - विराट कोहली

By admin | Updated: January 6, 2017 13:11 IST

बंगळुरू तरुणी छेडछाड घटनेवरुन क्रिकेटर विराट कोहलीनं संताप व्यक्त करत बघ्याच्या भूमिकेत असणा-या समाजाला फटकारले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6 - नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बंगळुरूमध्ये तरुणींची छेडछाड काढल्याच्या नीच कृत्याविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. क्रिकेटर विराट कोहलीनंही या घटनेविरोधात चीड व्यक्त करत स्त्री-पुरुष असा भेदभाव करणा-यांना खडेबोल सुनावले आहेत. 
 
'हा देश सर्वांसाठी सुरक्षित आणि समान असायलाच हवा. महिलांना वेगळी वागणूक दिली जाऊ नये. एकत्र येऊन अशा घृणास्पद घटनांविरोधात उभे राहू', असं ट्विट करत विराट कोहलीनं बंगळुरू छेडछाड घटनेविरोधात संपात व्यक्त करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.   
(बंगळुरुत 1500 पोलिसांच्या डोळ्यादेखत महिलांची छेडछाड)
ही घटना घडत असताना काही जण केवळ बघ्याच्या भूमिकेत होते, त्यांनाही विराटने फटकारले आहे. 'बघ्याच्या भूमिकेत असणा-यांना स्वतःला पुरुष म्हणण्याचा काहीही अधिकारी नाही', असेही त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.  
(VIDEO : बंगळुरु छेडछाड प्रकरण - सीसीटीव्हीत कैद झालं नीच कृत्य)
'जरी हीच घटना तुमच्या कुटुंबातील सदस्यासोबत घडली असती तरी देखील तुम्ही असाच तमाशा पाहिला असता का?', असा प्रश्नही विराटने उपस्थित केला आहे. 
(VIDEO : बंगळुरूच्या घटनेनं माझं रक्त खवळलं - अक्षय कुमार)
 
तसंच 'तरुणी-महिलांनी कोणते कपडे घालायचे हे त्या स्वतः ठरवतील, शिवाय अशा घटनांसाठी तरुणींना जबाबदार ठरवले जात आहे, ही बाब फार लज्जास्पद आहे', असं सांगत विराटने अशा घटनांवेळी हाताची घडी तोंडावर बोट ठेवणा-या समाजाला या व्हिडीओच्या माध्यमातून फटकारले आहे. 
 

काय आहे घटना -

31 डिसेंबरच्या रात्री एमजी रोड आणि ब्रिगेड रोडवर नवीन वर्षाच्या स्वागताचं सेलिब्रेशन करण्यासाठी हजारो लोक जमा झाले होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. रात्री 11 वाजता काही हुल्लडबाजांनी महिलांना हात लावण्यास आणि टिप्पणी करण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे परिसरात 1500 पोलीस तैनात असतानाही हा प्रकार घडला. या घटनेचे फोटो समोर आले असतानाही कोणताच गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. हुल्लडबाजांनी अर्धी रात्र झाल्यानंतर सगळ्या सीमा पार केल्या आणि महिलांना हवं तिथे स्पर्श करण्यास सुरुवात केली. महिलांचा विनयभंग होत होता. परिस्थिती एवढी बिघडली होती की जमलेल्या तरुणी, महिलांनी सँडल, चपला हातात घेऊन मदतीसाठी धावण्यास सुरुवात केली.

कोणताही गुन्हा नोंद नाही -

घटनेचे फोटो समोर आल्यानंतर तसंत प्रत्यक्षदर्शी असतानाही पोलिसांनी मात्र अजून कोणताच एफआयआर दाखल झालं नसल्याचं सांगितलं होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उपायुक्त संदिप पाटील यांनी 'महिलांची कुटुंबियांशी चुकामूक झाली होती, त्यांचा शोध लागत नसल्याने मदत मागत होत्या,' असा दावा केला आहे. विनयभंगाचा कोणताच गुन्हा दाखल केला गेला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

महिलांचे कपडे काढून केला विनयभंग -

सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनी दिलेली माहिती मात्र वेगळीच होती. चर्च मार्गावर तैनात एका महिला पोलिसाने 'काही हुल्लडबाजांनी दारुच्या नशेत असलेल्या महिलेचे कपडे काढून तिची छेड काढल्याचं', सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमजी आणि ब्रिगेड रोडवर 1500 पोलीस कर्मचारी तैनात होते.

नेत्यांची जीभ घसरली -

कर्नाटकचे मंत्री जी परमेश्वर यांच्यासोबतच अबू आझमी यांनी महिलांनी तोकडे कपडे घातले की अशा घटना होतात असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलं आहे.