शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

विराट 'खेलरत्न', रहाणे 'अर्जुन' पुरस्काराने होणार सन्मानित !

By admin | Updated: May 3, 2016 18:49 IST

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नावाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. याबरोबरच बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी अजिंक्य रहाणेच्या नावाची सिफारीश केली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ३ : भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड (बीसीसीआय़)ने क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च व प्रतिष्ठित अशा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नावाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. याबरोबरच बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी अजिंक्य रहाणेच्या नावाची शिफारीश केली आहे. बीसीसीआयने चार वर्षानंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी एखाद्या क्रिकेटपटूच्या नावाच्या शिफारीश केली आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी यापूर्वी २०१२ साली माजी कर्णधार राहुल द्रविडच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु त्यावेळी लंडन ऑलंपिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि निशानेबाज विजय कुमार यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. आतापर्यंत केवळ दोन क्रिकेटपटूंना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामध्ये सचिन तेंडुलकर (१९९७-९८) आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (२००७) यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. कोहलीला २०१३ यावर्षी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज क्रीडा मंत्रालयाकडे कोहली आणि अजिंक्य रहाणेची पुरस्कांरासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. विविध क्रीडा प्रकारातून या पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्यात येत असते. क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बीसीसीआयने या दोघांची शिफारस केलेली आहे. कोहलीला देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्कारासाठी निशानेबाज जीतू राई, गोल्फर अनिर्बान लहरी, स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लीकल तथा एथलीट टिंटू लुका यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे.