मुंबई : प्रेमाला उपमा नसते, तशी सीमारेषाही नसते, हे पुन्हा एकदा सिध्द झालं. हैदराबादमध्ये रविवारी क्रिकेटच्या मैदानावर अशीच एक छोटीसी लव्ह स्टोरी फुलली. या लव्हस्टोरीच्या आड मैदानाची सीमारेषाही आली नाही. निमित्त होतं. क्रिकेटपटू विराट कोहलीने आपली प्रेमिका अनुष्का शर्माला दिलेला ‘फ्लाईंग किस’चं.
श्रीलंकेविरुद्ध रविवारी खेळल्या गेलेल्या तिस:या वन-डे सामन्यात अर्धशतकी खेळी करणा:या विराट कोहलीने वन-डे कारकीर्दीत सर्वात वेगवान सहा हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम नोंदविला. सोबत अर्धशतकी खेळीही केली. विराटला चीअर करण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा व्हीव्हीआयपी बॉक्समध्ये उपस्थित होती. विराटने मैदानावरून आपल्या प्रेमाची कबुली देताना ‘दिवानगी’ची प्रचिती दिली. अनुष्काने उभे राहून विराटचे अभिनंदन केले. भारताचा स्टार फलंदाज विराटनेही मग आपल्या प्रेमाची साक्ष देताना हेल्मेट काढून अनुष्काला ‘फ्लाईंग किस’ देत काही क्षणासाठी सर्वाना आश्चर्यचकित केले.
विराटने श्रीलंकेविरुद्ध रविवारी तिस:या वन-डे सामन्यात 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याबरोबर भारताने विराटच्या नेतृत्वाखाली विजयाची हॅट्ट्रिक नोंदवीत श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 3-क् अशी विजयी आघाडी घेतली. भारतासाठी हा विजय विशेष होताच, त्याचप्रमाणो विराटसाठी वन-डे कारकीर्दीत सहा हजार धावांचा पल्ला गाठणो महत्त्वाचे ठरले. विराटने 5क् धावा पूर्ण केल्या त्यावेळी त्याने कारकीर्दीत सर्वात वेगवान सहा हजार धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम नोंदविला. विराटने 144 वन-डे सामन्यात 6क्क्3 धावा फटकाविल्या आहेत. यापूर्वी दोघांनी आपल्या प्रेमाबाबत कधीच जाहीरपणो कबुली दिली नाही. पण हे दोघे अनेकदा सोबत असल्याचे दिसून आले. आता मात्र विराटने जाहीर कबुली दिली. याआधी इंग्लंड दौ:यावर विराट अनुष्काला सोबत घेऊन गेल्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध जगजाहीर झाले. इंग्लंड दौ:यात विराटची कामगिरी निराशाजनक झाली. त्यामुळे प्रेमिकेला दौ:यावर घेऊन जाण्याबाबत बीसीसीआयला निर्देश द्यावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)