शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

‘विराट’ही भंगारात?

By admin | Updated: February 22, 2017 01:13 IST

भारतीय नौदलात ३० वर्षांची गौरवपूर्ण सेवा बजावलेली ‘आयएनएस विराट’ ही विमानवाहू युद्धनौका येत्या ६ मार्च

नवी दिल्ली : भारतीय नौदलात ३० वर्षांची गौरवपूर्ण सेवा बजावलेली ‘आयएनएस विराट’ ही विमानवाहू युद्धनौका येत्या ६ मार्च रोजी सक्रिय सेवेतून अधिकृतपणे निवृत्त झाल्यानंतर तिला बहुधा नाईलाजाने भंगार म्हणून विकावे लागेल, असे संकेत नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले.निवृत्तीनंतर ‘विराट’चे शैक्षणिक संग्रहालय म्हणून जतन करण्याचा प्रस्ताव आंध्र प्रदेश सरकारने दिला असला तरी त्यातून प्रत्यक्ष काही निष्पन्न होईल असे दिसत नाही. एवढी अजस्त्र युद्धनौका वापर न करता सांभाळणे खर्चिक असल्याने व नांगर टाकून ती नुसती बिनकामाची उभी करून ठेवण्यास गर्दीच्या मुंबई बंदरात किंवा कारवार नौदल तळावरही जागा नसल्याने बहुधा ‘विराट’च्या नशिबी भंगारात जाणेच येऊ शकेल, असे हा अधिकारी म्हणाला.खरोखर असे घडले तर ती ‘आयएनएस विक्रांत’ या भारतीय नौदलाच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेच्या नशिबी आलेल्या शोकांतिकेची पुनरावृत्ती ठरेल. या युद्धनौकेचेही संग्रहालयात रूपांतर करण्याचे महाराष्ट्र सरकार व काही खासगी संस्थांनी दिलेले प्रस्तावा फलद्रुप होतील याची तब्बल १७ वर्षे वाट पाहिल्यानंतर सन २००४ मध्ये ‘विक्रांत’चा भंगारात लिलाव पुकारावा लागला होता.२७,८०० टन वजनाची आणि १३ मजली उंचीच्या ‘विराट’चे संग्रहालय करण्यासाठी किमान एक हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शिवाय ती नांगर टाकून समुद्रकिनारी कायमस्वरूपी उभी करून ठेवण्यासाठी सोईची जागा शोधणे गरजेचे आहे. शिवाय संग्रहलायच्या महसुलातूनच तिच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च सुटेल, अशी व्यवस्था करावी लागेल. हा नौदल अधिकारी म्हणाला की, आंध्र प्रदेश सरकारच्या प्रस्तावातून हे शक्य होईल, असे दिसत नाही. कारण आंध्र प्रदेश सरकार युद्धनौकेसाठी पैसे द्यायला तयार आहे. पण तिचे संग्रहालय म्हणून जतन करण्याचा निम्मा सरकार नौदलाने उचलावा, असे त्या सरकारला वाटते. परंतु देखभाल आणि दुरुस्तीसाठी तांत्रिक सहकार्य व सल्ला फार तर आम्ही देऊ. पण या निवृत्त युद्धनौकेवर सतत पैसा खर्च करत राहणे शक्य होणार नाही, असे नौदलाचे म्हणणे आहे. ‘विराट’ची निवृत्तीची तारीख दोन आठवड्यांवर आली तरी तिचे नंतर नक्की काय होणार याचे चित्र स्पष्ट नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)सी हॅरियर्स विमाने शोभावस्तूविराट’ने आधीच्या अवतारात ब्रिटिश नौदलात २७ वर्षे व नंतर भारतीय नौदलात ३० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली..या काळात युद्धनौकेने पाच लाखांहून अधिक सागरी मैलांची सफर केली.सक्रिय सेवेत असताना ‘विराट’वर ११ सी हॅरियर ‘जंप जेट’ लढाऊ विमानांचा ताफा होता. गेल्या वर्षी ही विमाने ‘विराट’वरून काढून घेण्यात आली.आता ती नौदलाच्या अन्य आस्थापनांना शोभावस्तू म्हणून देण्यात येणार आहेत.

 

६ मार्च रोजी निरोप समारंभभारतीय नौदलातील सर्वात जुनी युद्धनौका असल्याने ‘ग्रँड ओल्ड लेडी’ म्हणून आदराने उल्लेख केल्या जाणाऱ्या ‘विराट’च्या औपचारिक निवृत्तीसाठी, अनेक वेळा तारखा पुढे ढकलल्यानंतर, आता ६ मार्च हा निवृत्तीचा दिवस ठरला आहे. मुंबईच्या नौदल गोदीत उभ्या असलेल्या या विमानवाहू युद्धनौकेस त्या दिवशी समारंभपूर्वक सक्रिय सेवेतून निरोप दिला जाईल. त्या दिवशी सूर्यास्तास या युद्धनौकेवरील तिरंगा झेंडा, नौदलाचा ध्वज व सेवेत रुजू होताना फडकावलेली नामपताका शेवटची आणि कायमसाठी खाली उतरविली जाईल. नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लान्बा व ‘विराट’वर काम केलेले अनेक अधिकारी या भावपूर्ण समारंभास उपस्थित राहतील. भारताने घेण्यापूर्वी ही युद्धनौका ‘हर्मिस’ या नावाने शही ब्रिटिश नौदलात होती.त्यामुळे ब्रिटिश नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल सर फिलिप जोन्स व अन्य अधिकारीही यावेळी आवर्जून हजर राहतील, असे सांगण्यात आले.