शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही

By admin | Updated: June 30, 2017 02:13 IST

गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा गोरक्षकांना देतानाच महात्मा गांधी व विनोबा भावे यांनी गोरक्षणाचा जो मार्ग दाखवला,

अहमदाबाद : गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा गोरक्षकांना देतानाच महात्मा गांधी व विनोबा भावे यांनी गोरक्षणाचा जो मार्ग दाखवला, त्याच मार्गाने आपण पुढे जायला हवे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना मोदी म्हणाले की, आपण अहिंसेची शिकवण मिळालेल्या देशात आहोत. गांधीजींच्या देशात आपण राहतो. त्यांनी आपला अहिंसेचा मार्ग कसा यशस्वी ठरतो, हे दाखवून दिले आहे. त्यांनी आणि विनोबा भावे यांनी आपल्याला गोरक्षणाचा जो मार्ग दाखवला, तोच आपण आत्मसात करायला हवा.पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांकडून होणाऱ्या हिंसाचाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, असे सांगत हिंसाचाराच्या घटनांबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. दोनच दिवसांपूर्वी झारखंडमध्ये एका व्यक्तीच्या घराबाहेर गाय मरून पडल्याचे दिसताच, तेथील लोकांनी त्याला मारहाण केली आणि त्याचे घर पेटवून दिले. मोदी यांच्या आजच्या भाषणाचा हा संदर्भ आहे. यापूर्वी हरयाणामध्ये अखलाक नावाच्या व्यक्तीला गोरक्षकांनी ठारच मारले होते. गोरक्षकांनी आतापर्यंत अनेकांवर असे हल्ले केले आहे. मध्यंतरी राजस्थानात तामिळनाडू सरकारने गायी खरेदी केल्या. त्या ट्रकने नेणाऱ्यांवरही गोरक्षकांनी हल्ला केला होता. ज्या देशात कुत्र्यांना खायला दिले जाते, मुंग्यांना अन्न दिले जाते, त्या देशातील लोकांना काय झाले आहे, ते हिंसाचार का करीत आहेत, असा सवाल करून मोदी म्हणाले की, रुग्ण मरण पावला की त्याचे नातेवाईक रुग्णालयच जाळू लागले आहेत. ही चिंतेची बाब आहे.महात्मा गांधी यांचे आध्यात्मिक गुरू श्री राजचंद्र यांची शिकवण आपण समजून घेतली पाहिजे, असेही मोदी यावेळी म्हणाले. तसेच चंपारण सत्याग्रहाला १00 वर्षे पूर्ण झाल्याचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते श्री राजचंद यांच्यावरील टपाल तिकीट व नाणे यांचे प्रकाशन त्यांनी केले. साबरमती आश्रमात त्यांनी काही मिनिटे सूतकताईही केली. (वृत्तसंस्था)