शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, जमावाला पांगवण्यासाठी लष्कराकडून अश्रुधुराचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 06:54 IST

सोमवारी सकाळी दहा वाजता न्यू लम्बुलेनच्या स्थानिक बाजारपेठेत मैतेई आणि कुकी समुदायात वाद झाला.

इम्फाळ : मणिपूरमधील ताज्या हिंसाचारात सोमवारी दुपारी जमावाने इम्फाळ पूर्व जिल्ह्यात दोन घरे जाळली. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी दुपारी दोन सशस्त्र लोकांनी व्यापाऱ्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले. जमावाने एकाला बेदम मारहाण केली, तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी दाखल लष्कराच्या जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

सूत्रांनी सांगितले की, सोमवारी सकाळी दहा वाजता न्यू लम्बुलेनच्या स्थानिक बाजारपेठेत मैतेई आणि कुकी समुदायात वाद झाला. त्याचे पर्यवसान जाळपोळीत झाले. जमावाने काही घरांना आग लावली.  यात काही लोक किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर इम्फाळ पूर्व जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  पोलिसांनी काही लोकांना पकडले असून, त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. (वृत्तसंस्था)

१८ दिवसांनंतर पुन्हा हिंसाचार मणिपूर शांत होत असतानाच पुन्हा जाळपोळ सुरू झाली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचारामुळे दहा हजार लोक विस्थापित झाले आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ७४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आतापर्यंत १७०० घरे जाळण्यात आली आहेत. राज्यात ३ मेपासून हिंसाचार सुरू आहे. मध्यंतरी तो थांबला होता. 

काय आहे प्रकरण?  n मणिपूरमध्ये ३८ लाख लोकसंख्येत अर्ध्याहून अधिक मैतेई समुदाय आहे. या समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी आहे. त्यासाठी ३ मे रोजी ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने मणिपूरमध्ये एक रॅली काढली होती. त्यानंतर हिंसाचार उसळला. n आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेवण्यासाठी हा समुदाय आरक्षण मागत आहे. मात्र, नागा आणि कुकी जमातींचा याला विरोध आहे. नागा आणि कुकी यांची लोकसंख्या ३४ टक्के आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार