शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारी अटकेचा डाव हे घटनेचे उल्लंघन

By admin | Updated: July 5, 2015 23:18 IST

शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर करेपर्यंत कोठडीत ठेवणे हे घटनेचे उल्लंघन असल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : सोमवारपर्यंत न्यायालयात सुनावणी होत नसल्यामुळे एखाद्याला डावपेच आखत शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर करेपर्यंत कोठडीत ठेवणे हे घटनेचे उल्लंघन असल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले आहे.बऱ्याचदा शिक्षा संपूनही कैद्यांना कारागृहात ठेवले जाते. तिहार कारागृहात जास्त काळ कैदेत ठेवल्याबद्दल तक्रार स्वीकारण्याची कोणतीही यंत्रणा नाही, त्याबद्दल नुकसानभरपाईही दिली जात नसल्याबद्दल केंद्रीय माहिती आयुक्त (सीआयसी) श्रीधर आचार्यलू यांनी कारागृह अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कोणत्याही कैद्याला मुदतीपेक्षा जास्त काळ कारागृहात ठेवू नये. माहिती अधिकार कायद्यानुसार स्वत:हून त्याबाबत माहिती द्यावी, असेही ते आदेशात म्हणाले. न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेपेक्षा एक दिवसही जास्त काळ कारागृहात ठेवल्याने वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावले जाते. साधारणपणे शुक्रवारी रात्री अटक करून आरोपींना सोमवारपर्यंत ताब्यात ठेवले जात असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे ताब्यात ठेवणे हे घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन असून, तो गुन्हा ठरतो. कैद्यांना अधिक काळ कैदेत ठेवताना त्यांची कोणतीही तक्रार ऐकून न घेणे, त्यांना त्याबद्दल नुकसानभरपाई न देणे आरटीआयअंतर्गत कैद्यांना माहिती न पुरविणे ही तिहार कारागृह अधिकाऱ्यांची पद्धत चुकीची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.सीआयसीकडे धाव> कैदी ओ.पी. गांधी यांनी तिहार कारागृहाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे सीआयसीकडे धाव घेतली होती. त्यांनी आयोगाकडे तिहार कारागृहाने ठोठावलेल्या एकूण शिक्षेपेक्षा चार दिवस जास्त काळ कैदेत ठेवल्याची तक्रार केली होती.गांधी यांनी तिहार कारागृहात तक्रार स्वीकारण्यासाठी कोणतीही अंतर्गत यंत्रणा नसल्याकडे लक्ष वेधले. त्यावर आचार्यलू यांनी अर्जदाराला चुकीच्या पद्धतीने ताब्यात ठेवल्याबद्दल सनदी किंवा फौजदारी न्यायालयाकडेच दाद मागण्याशिवाय अन्य पर्याय दिसत नसल्याचे नमूद करताना कारागृह अधिकाऱ्यांना चांगलीच समज दिली. आचार्यलू हे हैदराबादच्या नलसार येथे कायद्याचे प्रोफेसर राहिले आहेत.