शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण चित्र विदारकच!

By admin | Updated: July 4, 2015 04:04 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके पूर्ण होत असताना अणि खासकरून गेल्या २० वर्षांत वेगाने आर्थिक विकास होऊनही ग्रामीण भारताचे चित्र आजही विदारक असल्याचा निष्कर्ष केंद्र सरकारने केलेल्या

नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके पूर्ण होत असताना अणि खासकरून गेल्या २० वर्षांत वेगाने आर्थिक विकास होऊनही ग्रामीण भारताचे चित्र आजही विदारक असल्याचा निष्कर्ष केंद्र सरकारने केलेल्या सामाजिक-आर्थिक आणि जातीय जनगणनेत (एसईसीसी-२०११) मध्ये अधिकृतपणे नोंदविण्यात आला आहे. विकासगंगा तळागाळापर्यंत न झिरपल्याने खेड्यातील प्रत्येक तीन कुटुंबांपैकी एक कुटुंब भूमिहीन आणि उदरनिर्वाह चालविण्यासाठी हातमजुरीवर अवलंबून असल्याचे या जनगणनेवरून स्पष्ट होते.सरकारद्वारा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या आधारे करण्यात आलेली ही देशातील पहिलीच कागदविरहित जनगणना आहे. १९३२ नंतर ही पहिलीच जनगणना आहे, ज्यात प्रांत विशेष, समुदाय, जाती आणि आर्थिक समूहासंबंधी विविध प्रकारचा तपशील आहे आणि कुटुंबांच्या विकासाचे त्यात आकलन करण्यात आले आहे.

या जनगणनेत सर्व ग्रामीण कुटुंबांमध्ये ज्यांचे मासिक उत्पन्न १० हजार रुपयांपेक्षा जास्त नाही किंवा ज्यांच्याजवळ मोटार, मासेमारी नौका वा किसान क्रेडिट कार्ड नाही, अशा ७.०५ (३९.३९ टक्के) कुटुंबांना ‘बाहेर ठेवलेले कुटुंब’ संबोधण्यात आले आहे.

ग्रामीण कुटुंबांपैकी ५.३९ कोटी कुटुंबांची उपजीविका शेतीवर निर्भर आहे. ९.१६ कोटी कुटुंबे हातमजुरी करून तर किमान ४४.८४ लाख कुटुंबे दुसऱ्याच्या घरी घरकाम करून उपजीविका चालवितात. ४.०८ लाख कुटुंबे कचरा वेचून, तर ६.६८ लाख कुटुंबे भीक मागून पोट भरतात.

जातींच्या संख्येबाबत मौनसरकारने सामाजिक-आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली असली, तरी त्यात जातींच्या संख्येबाबत मात्र मौन पाळले आहे. या जनगणनेत जातींचा उल्लेख का नाही, या प्रश्नाला ग्रामीण विकासमंत्री चौधरी बीरेंद्र सिंग यांनी बगल दिली. जनगणना करण्याचे रजिस्ट्रार जनरल (जनगणना) यांच्या अधिकारात येते. तेच या प्रश्नावर बोलू शकतील.भारताची वास्तविकता जाहीर होईल. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व धोरण निर्धारकांसाठी हा दस्ताऐवज अतिशय महत्त्वाचा ठरेल. सरकारला उत्तम धोरण तयार करण्यास मदत होईल. -अरुण जेटली, केंद्रीय वित्तमंत्री