शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमी योगोत्सव

By admin | Updated: June 22, 2015 03:28 IST

१९२ देशांमधील २२५ शहरांमध्ये साजऱ्या झालेल्या योग दिनात कोट्यवधी लोकांनी योगासने करून भारताच्या या मोहिमेत भरीव योगदान दिले.

नवी दिल्ली : भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी जगभर योगोत्सव साजरा झाला. १९२ देशांमधील २२५ शहरांमध्ये साजऱ्या झालेल्या योग दिनात कोट्यवधी लोकांनी योगासने करून भारताच्या या मोहिमेत भरीव योगदान दिले. भारतात झालेल्या मुख्य कार्यक्रमात दिल्लीतील राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत ३५ हजारांवर लोकांनी सामुदायिक योगासने करीत नवा इतिहास रचला. देशाच्या कानाकोपऱ्यात झालेल्या अशाच कार्यक्रमांना लोकांनी उत्साह दाखवत मोठी गर्दी केली होती. मोदींनी गेल्या वर्षी संयुक्त  राष्ट्राच्या महासभेत २१ जून आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. १७७ देशांनी त्याला समर्थन दिले होते. प्रत्यक्षात त्याहूनही अधिक देशांमध्ये या योगदिन साजरा केला केला गेला. विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्राकडून आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली.संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करताना भलतेच उत्साहात होते, त्यांनी आपला आनंद श्रीमती सुषमा स्वराज यांच्याजवळ व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे संपूर्ण जगात अपूर्व उत्साहाची लाट आली आहे, असे बान की मून यांनी म्हटले.उत्तर प्रदेश सरकारने योगदिनाला विरोध केला असतानाही तेथील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि झारखंडमध्येही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. लखनौच्या के के डी सिंग बाबू स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री राजनाथसिंग सहभागी झाले होते. मुस्लिमांनीही या कार्यक्रमात सहभागी होत राजकीय अभिनिवेष बाजूला सारला. काही धर्मगुरूंनी योगाची सुरुवात ‘ओम’ने करण्यावर आक्षेप घेतला होता. पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये विविध योग कार्यक्रमांत उत्साहाचे वातावरण दिसून आले. पश्चिम उत्तर प्रदेशची काही गावे स्वातंत्र्यानंतर प्रथमच वेगळ्या वातावरणाने भारली गेली. गावांगावांमधून पारंपरिक गीत गात आणि नृत्य करीत महिला, मुले आणि युवक कार्यक्रमात सहभागी झाले. महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.बिहारच्या पाटणा शहरातील मोईनुलहक स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात भाजपाध्यक्ष अमित शहा सहभागी झाले होते. माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते. भोपाळ येथील लाल परेड मैदानावर मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. रायपूर येथील कार्यक्रमात छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्यासह अनेक मंत्री आणि १४ हजारावर शाळकरी मुले सहभागी झाली होती. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सामूहिक योग कार्यक्रमात मुख्यमंत्री वसुंधरा राजे सहभागी झाल्या. उत्तराखंडच्या ऋषिकेश येथे परमार्थ आश्रमाचे अध्यक्ष चिदानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत शेकडो साधकांनी गंगेच्या किनाऱ्यावर योगाभ्यास केला. (लोकमत यूज नेटवर्क)