विकास कृष्णला द्वितीय मानांकन
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
आशियाई चॅम्पियनशिप : सहा खेळाडूंना पुढे चाल
विकास कृष्णला द्वितीय मानांकन
आशियाई चॅम्पियनशिप : सहा खेळाडूंना पुढे चालबँकॉक : विद्यमान चॅम्पियन शिव थापा (५६ किलो) याच्यासह ६ भारतीय खेळाडूंना आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. त्याचप्रमाणे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदकप्राप्त विकास कृष्ण (७५ किलो) याला द्वितीय मानांकन मिळाले आहे. मानांकन मिळणारा विकास हा या स्पर्धेतील एकमेव खेळाडू आहे.भारताकडून फक्त मनीष कौशिक (६० किलो) हाच आज खेळण्यासाठी रिंगमध्ये उतरला. त्याने प्रारंभीच्या फेरीत बांगलादेशाच्या एम. हुसेनचा एकतर्फी लढतीत ३-० असा पराभव करून आपल्या अभियानाला सुरुवात केली. तो पुढील फेरीत २९ ऑगस्ट रोजी चीनचा चीन लोंग याच्याशी दोन हात करील. भारताच्या उर्वरित मुष्टियोद्ध्यांसाठी आज विश्रांतीचा दिवस ठरला. कारण, आज सकाळी टाकलेल्या ड्रॉमध्ये त्यांना पुढे चाल मिळाली. ही स्पर्धा विश्व चॅम्पियनशिपसाठी क्वॉलिफाइंग टुर्नामेंट आहे, जी ऑक्टोबर महिन्यात दोहा येथे होईल.पुढे चाल मिळणार्या खेळाडूंत रौप्यपदकप्राप्त एल. देवेंद्रो सिंह (४९ किलो), मदनलाल (५२ किलो), मनोजकुमार (६४ किलो) आणि कुलदीप सिंह (८१ किलो) यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू ३० ऑगस्टच्या आधी रिंगमध्ये खेळण्यास उतरणार नाही. गेल्या वेळेतील अन्य एक रौप्यपदकप्राप्त मनदीप जांगडा (६९ किलो) २८ ऑगस्ट रोजी पहिल्या फेरीत व्हिएतनामचा वियन नागोक हुएन याच्याविरुद्ध खेळेल. हा सामना जिंकल्यास तो ३० ऑगस्टमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत जपानचा यासोहिरो सुजुकी याच्याशी दोन हात करील.(वृत्तसंस्था)००अमेरिकन ओपनमध्ये सेरेना, जोकोविच यांना अव्वल मानांकनन्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सेरेना विल्यम्स आणि पुरुषांत सर्बियाचा नोव्हाक जोकोविच हे ३१ ऑगस्टपासून सुरू होणार्या चौथ्या आणि अखेरच्या ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपन टेनिस (यूएस) स्पर्धेत अव्वल मानांकित खेळाडू असतील.सेरेना आपल्या घरच्या मैदानावर सोमवारपासून सुरू होणार्या यूएस ओपनमध्ये २७ वर्षांनंतर प्रथमच कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवून खेळेल. महिला एकेरीत सेरेनाने या वर्षीच्या तिन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत आणि तिला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २०१४ची फ्रेंच ओपन उपविजेती रुमानियाची सिमोना हालेप द्वितीय मानांकित खेळाडू असेल. ताज्या क्रमवारीत तिसर्या स्थानावर घसरण झालेली २००६ची यूएस ओपनविजेती रशियाची मारिया शारापोव्हा हिला तृतीय मानांकन देण्यात आले आहे. तसेच, २०१४ची यूएस ओपनउपविजेती डेन्मार्कची कॅरालिन वोझ्नियाकी चौथी मानांकित खेळाडू असेल.पाच वेळांचा यूएस ओपन चॅम्पियन स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला पुरुष एकेरीत द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. पुरुष गटात या वेळेसचा मुकाबला खूप संघर्षपूर्ण ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे अव्वल १० मानांकित खेळाडूंत ५ यूएस ओपन चॅम्पियन आणि सहा गँ्रडस्लॅम चॅम्पियन खेळणार आहेत.त्यात २०११चा यूएस ओपन चॅम्पियन सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याला अव्वल मानांकन देण्यात आले. त्याचबरोबर, २००४ आणि २००८चा विजेता फेडरर द्वितीय मानांकित खेळाडू असेल, तसेच २०१२चा विजेता ब्रिटनचा अँडी मरे, २०१० आणि २०१३चा चॅम्पियन स्पेनचा राफेल नदाल आणि गेल्या वर्षीचा चॅम्पियन क्रोएशियाचा मारिन सिलीच यांचा अव्वल १० मानांकित खेळाडूंमध्ये समावेश आहे. (वृत्तसंस्था)