शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - तुरुंगातून पळालेले सिमीचे आठ दहशतवादी चकमकीत ठार

By admin | Updated: October 31, 2016 12:28 IST

भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पळालेले आठही दहशतवादी सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

भोपाळ, दि. ३१ - सुरक्षा रक्षकाची हत्या करुन भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पळालेले सिमीचे आठ दहशतवादी मध्यप्रदेश पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले आहेत. भोपाळ कारागृहापासून १० किमी अंतरावर अचारपुरा गावाजवळ ही चकमक झाली.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षकाची हत्या करुन हे दहशतवादी तुरुंगातून फरार झाले होते. मध्यवर्ती कारागृहाच्या बी ब्लॉकमध्ये या आठही दहशतवाद्यांना ठेवण्यात आले होते. या प्रकरणी तुरुंग अधीक्षकासह पाच जणांना निलंबित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्रालयाने या पलायनासंबंधी मध्यप्रदेश सरकारकडून अहवाल मागवला आहे.
त्यांनी स्टीलच्या प्लेटने सुरक्षा रक्षकाची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर चादरींच्या सहाय्याने भिंत चढून त्यांनी पलायन केले. मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती भोपाळचे डीआयजी रमन सिंह यांनी दिली. पळालेल्या आठ दहशतवाद्यांमध्ये जाकीर मेहबूब शेख आणि अमजद यांचा समावेश असून, ते २०१३ मध्येही कारागृहातून पळाले होते.
सिमीचे दहशतवादी मध्यप्रदेशातील कारागृहातून पळून जाण्याची ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये सिमीचे सात दहशतवादी खांडवा तुरुंगातून पळाले होते. स्नानगृहाच्या खिडकीला असलेल्या सळया तोडून या दहशतवाद्यांनी पलायन केले होते. मोठा सुरक्षा बंदोबस्त असलेल्या मध्यवर्ती कारागृहातून या दहशतवाद्यांनी अशा प्रकारे पलायन केल्याने सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
खांडवा तुरुंगातून २०१३ मध्ये पळालेल्या सात दहशतवाद्यांना तीन वर्षांनी अटक करण्यात आली होती. हे दहशतवादी फरार असताना मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते. 
 
ठार झालेल्या अतिरेक्यांची नावे
शेख मुजीब, खालिद अहमद, अकील, अब्दुल माजिद, मोहम्मद सलीक, जाकिर हुसैन, शेख महबूब, अमजद उर्फ पप्पू शेख