शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: अधिका-यावर भडकले आझम खान, म्हणाले हे मोदींनी सांगितलं का

By admin | Updated: March 16, 2017 12:09 IST

आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले समाजवादी पक्षाचे नेता आझम खान पुन्हा एकदा चर्चेत

ऑनलाइन लोकमत
रामपूर , दि. 16 - आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले समाजवादी पक्षाचे नेता आझम खान पुन्हा एकदा चर्चेत आहेत.  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी समाजवादी पक्षाला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं तरी आझम खान आणि त्यांचा मुलगा विजयी झाले. आपल्या विजयाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी ते रामपूरमध्ये गेले असता तेथील अधिका-यावर चांगलेच भडकले. त्यावेळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 
 
आझम खान विजयाचं प्रमाणपत्र घ्यायला जात असताना पाऊश पडत होता. त्यामुळे रस्त्यात चिखल झाला होता. त्यामुळे मतमोजणी कार्यालयात पोहोचण्यास त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे गाडीतून उतरून ते चालत निघाले. चिखलाच्या रस्त्यावरून चालत जात ते प्रमाणपत्र घेण्यास पोहोचले आणि तेथे उपस्थित अधिका-यावर चांगलेच संतापले.   
 
''प्रमाणपत्र अशाप्रकारे आणायचंय हे देखील मोदींनी सांगितलेलं का, प्रमाणपत्र मी नंतर घेईन, तुम्ही चला माझ्यासोबत त्या रस्त्यावर , चालून दाखवा त्या रस्त्यावर असं म्हणत त्यांनी खराब रस्त्यांसाठी समाजवादी पक्ष जबाबदार असल्याचंही मान्य केलं. आमच्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे, रस्त्यावर इतका चिखल असणं वाईट आहे. ही चांगली गोष्ट नक्कीच नाही...पण अजून सरकार आहे. अजून मी मंत्री आहे आणि नवी सरकार बनेपर्यंत मी मंत्री असेल. या दोन-तीन दिवसात तुमच्यावर कारवाई करण्याचा अधिकारही आहे माझ्याकडे.असं ते या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. 
उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला 312 जागा, समाजवादी पक्षाला 47, बहुजन समाज पक्षाला 19 आणि कॉंग्रेसला केवळ 7 जागांवर विजय मिळाला आहे.