शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- ...आणि भररस्त्यात सचिनने तरुणांना दिला हेल्मेट घालण्याचा सल्ला!

By admin | Updated: April 9, 2017 14:17 IST

क्रिकेटच्या मैदानावर अनेक नवंनवे रेकॉर्ड करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सामाजिक सेवेनं हैदराबादकर आश्चर्यचकित झाले

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - क्रिकेटच्या मैदानावर अनेक नवंनवे रेकॉर्ड करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सामाजिक सेवेनं हैदराबादकर आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकदा वाहतूक पोलीस बाईकस्वारांना अपघात टाळण्यासाठी हेल्मेट घालण्याची सूचना करतात. त्यासाठी कायदाही कठोर करण्यात आला आहे. मात्र तरीही अजून काही जण हेल्मेट न घालताच बाईक चालवतात. अशा बाईकस्वारांना दंड ठोठावूनही ते काही मार्गावर येत नाहीत. आता मात्र चक्क क्रिकेटचा देव यासाठी पुढे सरसावला आहे. हैदराबादेत एक तरुण विनाहेल्मेट बाईक चालवत असताना सचिननं गाडी थांबवून त्याला हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला. साक्षात सचिननं सल्ला देतोय म्हटल्यावर सुरुवातीला त्या तरुणाला विश्वासच बसला नाही. मात्र त्यानंतर त्या तरुणानं बाईक थांबवून सचिनसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सचिननं पुन्हा एकदा त्यांना हेल्मेट परिधान करण्यास सांगितलं आणि त्या तरुणांनीही हेल्मेट घालण्यास स्वीकृती दर्शवली. सचिन कारमधून हैदराबादमधील उप्पल रोडवरून जात असताना हा बाका प्रसंग लोकांना पाहायला मिळाला. भररस्त्यात गाडीची काच खाली करून सचिनने त्यांना जवळ बोलवून हेल्मेट घालण्याचे आवाहन केले. आयुष्य हे अनमोल आहे, ते जपा आणि हेल्मेट घालूनच बाईक चालवा, असा सल्ला सचिनने त्या तरुणांना दिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सचिनने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. अशा प्रकारचे आवाहन करून सचिनने सामाजिक भान जपलं असून, समाजकार्यातही तो आता सक्रिय असल्याचं अनेकांना दर्शन घडलं.