विदर्भ- तामिळनाडू
By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST
विदर्भावर फॉलोऑनचे सावट
विदर्भ- तामिळनाडू
विदर्भावर फॉलोऑनचे सावटरणजी उपांत्यपूर्व लढत: तामिळनाडूविरुद्ध पीछेहाटजयपूर : तामिळनाडूच्या ४०३ धावांच्या डोंगरापुढे विदर्भ संघाला रणजी करंडक उपांत्यपूर्व सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी २०६ धावांत सहा फलंदाज गमवावे लागल्याने फॉलोऑनचे संकट उभे ठाकले आहे.विदर्भ अद्याप तामिळनाडूच्या तुलनेत १९७ धावांनी माघारला असून चार फलंदाज शिल्लक आहेत. सचिन कटारिया ४२, कर्णधार सुब्रमण्यम बद्रिनाथ ४०, शलभ श्रीवास्तव ३९, रवी जांगिड नाबाद २६ आणि उर्वेश पटेलने ३१ धावांचे योगदान दिले. तामिळनाडूकडून अश्विन ख्रिस्ट याने ४७ धावा देत तीन गडी बाद केले.विदर्भाने कालच्या बिनबाद ९ धावांवरुन तिसऱ्या दिवशी सकाळी फलंदाजी सुरू केली. सुरुवातीचे चार फलंदाज विकेटवर स्थिरावले खरे पण चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात सर्वांना अपयश आले. सुरुवातीचे दोन्ही गडी २१ धावांत बाद झाले. तेव्हापासून विदर्भाचा संघर्ष खेळ संपेपर्यंत सुरूच होता. (वृत्तसंस्था)धावफलकतामिळनाडू पहिला डाव :४०२. विदर्भ पहिला डाव : कालच्या बिनबाद ९ वरुन फैज फझल झे. प्रसन्ना गो. अश्विन ख्रिस्ट १५, सचिन कटारिया झे. बालाजी गो. रंगराजन ४२, गणेश सतीश त्रिे. गो. अश्विन ख्रिस्ट ००, झे.कार्तिक गो. परमेश्वरन ४०, शलभ श्रीवास्तव झे. आणि गो. अश्विन ख्रिस्ट ३९, रवी जांगिड खेळत आहे २६, उर्वेश पटेल त्रि, गो. बालाजी ३१, अवांतर : १३, एकूण :९०.४ षटकांत ६ बाद २०६ धावा. गडी बाद क्रम : १/२१, २/२१, ३/९३, ४/१३२, ५/१४६, ६/२०६. गोलंदाजी : पी. परमेश्वरन २०-६-४५-१, लक्ष्मीपती बालाजी १८.४-९-३५-१, अश्विन ख्रिस्ट १६-७-४७-३, व्ही. शंकर ६-०-२४-०, एम. रंगराजन २३-११-३८-१, बी. अपराजित ७-४-७-०.