विदर्भ-पांडुरंग ढोले प्रदेश जनता दल अध्यक्षपदी
By admin | Updated: November 12, 2016 00:40 IST
चांदूररेल्वे : प्रदेश जनता दल अध्यक्षपदी पांडुरंग ढोले यांची निवड करण्यात आली आहे.
विदर्भ-पांडुरंग ढोले प्रदेश जनता दल अध्यक्षपदी
चांदूररेल्वे : प्रदेश जनता दल अध्यक्षपदी पांडुरंग ढोले यांची निवड करण्यात आली आहे.मुंबई येथील प्रदेश जनता दलाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी बुधवारी बैठक बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी प्रदेश जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी आमदार शरद पाटील होते.प्रदेश जनता दलाचे महासचिव प्रताप होंगाडे यांनी अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव सादर केला. अध्यक्षपदाकरिता पांडुरंग ढोले यांचे नाव सुचविण्यात आल्याने त्यांच्या नावाची अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. यावेळी मंुंबई येथील नाथा शेवाळे, सरिता मानकर, अजमल खान, वली अहमद, पी.डी.जोशी, सलीम भाई आदींची उपस्थिती होती. या नियुक्तीबद्दल अंबादास हरणे, छाया झाडे, सुधीर सव्वालाखे, मेहमूद हुसैन, दिलीप घोडे, देवीदास शेंबे आदींनी कौतुक केले आहे. पांडुरंग ढोले हे १९९७-९८ या काळात पक्षाचे अध्यक्ष होते. (तालुका प्रतिनिधी)