शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

सराईत गुन्हेगारांकडून पंचवटीत युवकाची हत्त्या

By admin | Updated: May 28, 2016 01:06 IST

हनुमानवाडी कॉर्नरवरील घटना : एक गंभीर जखमी, मोक्क्यातील आरोपींचा सहभाग

हनुमानवाडी कॉर्नरवरील घटना : एक गंभीर जखमी, मोक्क्यातील आरोपींचा सहभाग पंचवटी : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून महिनाभरापूर्वीच सुटून आलेल्या सराईत गुन्हेगारांनी हनुमानवाडीतील दोघा युवकांना लाकडी दांडके व दगडाने जबर मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि़२७) रात्रीच्या नऊ वाजेच्या सुमारास हनुमानवाडी कॉर्नरवर घडली़ या हल्ल्यामध्ये सुनील रामदास वाघ (३२) या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मोठा भाऊ हेमंत सुनील वाघ (३८, रा़दीप्ती अपार्टमेंट, हनुमानवाडी) गंभीर जखमी झाला आहे़ या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे़ पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमानवाडी कॉर्नरवर वाघ बंधूंचा भेळपुरी व पाणीपुरीचा गाडा असून त्यांचे पंचवटीतील सराईत गुन्हेगार तसेच मोक्क्यातील आरोपी संशयित कुंदन परदेशी, किरण परदेशी व अक्षय इंगळे यांच्यासोबत पूर्ववैमनस्य होते़ शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हे संशयित आठ-दहा साथीदारांसमवेत भेळपुरीच्या गाड्यावर आले व लाकडी दांडके व दगडाने वाघ बंधूंवर हल्ला चढविला़ या हल्ल्यात सुनील वाघचा मृत्यू झाला तर हेमंत गंभीर जखमी झाला ़ यानंतर संशयितांनी पळ काढला़या घटनेनंतर नागरिकांनी या दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता सुनीलचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले, तर हेमंत वाघची प्रकृती गंभीर असून त्यास अधिक उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, प्रकाश सपकाळे हे घटनास्थळी हजर झाले होते़ त्यांनी घटनास्थळावरून दोन लाकडी दांडके व दगड जप्त केले आहेत़ या घटनेनंतर हनुमानवाडी परिसरात तणाव निर्माण झाला असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ शहरात सुरू असलेले खून सत्र व सराईत गुन्हेगारांच्या हैदोस यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत़ दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़(प्रतिनिधी)--इन्फो--मोक्क्यातील काही आरोपींचा सहभाग?पंचवटी पोलिसांनी गतवर्षी हिरावाडी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीस अटक करून मोक्का अन्वये कारवाई केली होती़ यामध्ये पंचवटीतील जवळपास सर्वच सराईत गुन्हेगारांचा समावेश होता़ या गुन्हेगारांपैकीच काहींचा यामध्ये समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़