उष्माघाताने घेतला वडलीच्या महिलेचा बळी
By admin | Updated: April 28, 2016 00:32 IST
जळगाव: तालुक्यातील वडली येथील रेखाबाई दत्तू पाटील (वय ३५) यांचा बुधवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. रेखाबाई या दुपारी एक वाजता घराजवळ काम करत असताना अचानक त्यांना चक्कर व रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांना तातडीने जळगावात दवाखान्यात आणण्यात आले, मात्र वाहन आकाशवाणी चौकात पोहचल्यावर त्यांची प्राणज्योत मालवली. खासगी दवाखान्यात नेण्यात आले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रेखाबाई यांच्या पात पती दत्तू गणपत पाटील व एक मुलगा आहे. महिन्याभरात उष्माघाताचा जिल्ातील हा चौथा बळी आहे. गेल्या आठवड्यात नशिराबाद येथेही तरुणाचा असाच मृत्यू झाला होता. रेखाबाई यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वडली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.