शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपती निवडणूक : नितीश कुमार, नवीन पटनायक यांचा गोपाळकृष्ण गांधी यांना पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 04:36 IST

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे व्यंकय्या नायडू व विरोधी पक्षांचे गोपाळकृष्ण गांधी यांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. त्याआधी नायडू यांनी मंत्रिपदाचा

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे व्यंकय्या नायडू व विरोधी पक्षांचे गोपाळकृष्ण गांधी यांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. त्याआधी नायडू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केला. ही निवडणूक ५ आॅगस्ट रोजी होणार आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची मुदत १९ आॅगस्ट रोजी संपत आहे. लोकसभा व राज्यसभा यांतील ७१६ सदस्य त्यासाठी मतदान करतील. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देणाऱ्या नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल आणि नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल यांनी आता गोपाळकृष्ण गांधी यांना पाठिंबा जाहीर केला आहे.गोपाळकृष्ण गांधी म्हणाले की, देशातील सामान्यांचा आज राजकीय पक्ष व राजकारणावरील विश्वास उडत चालला असून, हे चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू. देशाची धर्म, जात अशी जी विभागणी होत आहे, ती थांबवणे, ते माझे कर्तव्य आहे, असे मी मानतो. मला आता पक्ष नाही अर्ज भरल्यानंतर नायडू म्हणाले की, आता मी कोणत्याही पक्षाशी संबंधित राहिलेलो नाही. चाळीस वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात मी कधीही भेदभाव केला नाही, उपराष्ट्रपती झाल्यावरही तो करणार नाही. राधाकृष्णन, झाकीर हुसेन, हिदायतुल्ला, वेंकटरामन, शंकर दयाळ शर्मा, भैरोसिंह शेखावत यांच्यासारख्या दिग्गजांनी उपराष्ट्रपतिपद भूषविले आहे, याची मला कल्पना आहे. त्यामुळे त्या पदाचा आब व मान कायम राखू.

स्मृती इराणींकडे माहिती व प्रसारण व्यंकय्या नायडू यांच्याकडील खात्यांची जबाबदारी मोदी यांनी अन्य मंत्र्यांना दिली. माहिती व प्रसारण खाते स्मृती इराणी यांना दिले आहे. त्या वस्त्राद्योगमंत्री आहेत. त्यांनी आजच या खात्याची सूत्रे स्वीकारली. नगरविकास खाते नरेंद्र सिंग तोमार यांच्याकडे देण्यात आले. तोमार सध्या ग्रामविकास व पंचायत राजमंत्री आहेत.