शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक 5 आॅगस्टला होणार संपन्न

By admin | Updated: June 29, 2017 21:57 IST

भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ आॅगस्ट रोजी संपन्न होईल व त्याच दिवशी मतमोजणीही केली जाईल

ऑनलाइन लोकमत/सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 29 - भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ आॅगस्ट रोजी संपन्न होईल व त्याच दिवशी मतमोजणीही केली जाईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त नसिम जैदी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली.गुप्त मतदान पध्दतीने होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना ४ जुलै रोजी जाहीर होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १८ जुलै असून १९ जुलै रोजी अर्जांची छाननी होईल. निवडणूक अटळ ठरल्यास ५ आॅगस्ट रोजी सकाळी १0 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संसद भवनात मतदान होईल व त्यानंतर मतमोजणीही त्याच दिवशी संपन्न होईल. उपराष्ट्रपतीपदाच्या निर्वाचन मंडळात लोकसभेचे निर्वाचित ५४३ + नामनियुक्त २ सदस्य तसेच राज्यसभेचे निर्वाचित २३३ व नामनियुक्त १२ सदस्य अशा संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकुण ७९0 सदस्यांचा समावेश आहे. तथापि यापैकी सध्या काही जागा रिक्त आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सलग दोनदा हे पद भूषवले. त्यांचा कार्यकाल १0 आॅगस्ट रोजी संपतो आहे.भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतीनंतर उपराष्ट्रपतीपद हे महत्वाचे पद असून राज्यसभेचे पदसिध्द सभापतीपद उपराष्ट्रपती भूषवतात. सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएतर्फे गुजराथच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, खासदार हुकूमदेव नारायणसिंग व नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूंच्या नावाची राजधानीत चर्चा आहे. विरोधकांतर्फे या पदासाठी कोणाची उमेदवारी जाहीर होईल, हे अद्याप स्पष्ट नाही.