शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आज ठरणार उपराष्ट्रपती,संध्याकाळी निकाल; व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:54 IST

उपराष्ट्रपतीपदासाठी शनिवारी मतदान होत आहे. सत्तारूढ रालोआचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू व विरोधी पक्षांतर्फे गोपाळकृष्ण गांधी यांच्यात लढत असली तरी, नायडू यांची निवड निश्चित मानली जात आहे. मतदानानंतर संध्याकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदासाठी शनिवारी मतदान होत आहे. सत्तारूढ रालोआचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू व विरोधी पक्षांतर्फे गोपाळकृष्ण गांधी यांच्यात लढत असली तरी, नायडू यांची निवड निश्चित मानली जात आहे. मतदानानंतर संध्याकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.लोकसभेत बहुमत असलेल्या रालोआचे उमेदवार नायडू हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडले जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा आहे. गोपाळकृष्ण गांधी हे विरोधकांचे संयुक्त उमेदवार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांचे समर्थन करणाºया बीजू जनता दल आणि जदयूने उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांना पाठिंबा दिला आहे.जदयूने बिहारमध्ये महाआघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत राज्यात नवे सरकार स्थापन केले. पण, पक्षाने उपराष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय बदललेला नाही.शनिवारी सकाळी १० ते ५ या वेळेत होणाºया मतदान प्रक्रियेत संसद सदस्य आपल्या पसंतीचे मत देण्यासाठी विशेष प्रकारच्या पेनचा उपयोग करतील. निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांनी सांगितले की, मतदानानंतर तत्काळ मतमोजणी होणार आहे आणि रात्री सातपर्यंत निकाल हाती येतील. विशेष म्हणजे राजकीय पक्ष या निवडणुकीत व्हिप जारी करू शकत नाहीत. कारण, मतदान गोपनीय पद्धतीने होते.विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० आॅगस्ट रोजी संपत आहे. ते सलग दोन वेळा या पदावर राहिले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार संसदेच्या दोन्ही सभागृहांतील निवडून आलेल्याआणि नियुक्त सदस्यांनाअसतो. दोन्ही सभागृहातील सदस्यांची एकूण संख्या ७९० आहे. पण, लोकसभेत दोन आणि राज्यसभेत एक जागा रिक्त आहे. याशिवाय लोकसभा सदस्य छेदी पासवानयांना न्यायालयाच्या एकानिर्णयानंतर मतदानासाठी बंदी करण्यात आली आहे.राज्यसभेत भाजपाला ‘बळ’लोकसभेतील एकूण ५४५ सदस्यांपैकी भाजपाचे २८१ सदस्य आहेत. तर, भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे एकूण ३३८ सदस्य आहेत, तसेच २४३ सदस्यीय राज्यसभेत भाजपाचे एकूण ५८ सदस्य आहेत.सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे ५७ सदस्य आहेत. भाजपा आजच राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्या सभागृहात विरोधी सदस्यांची संख्या रालोआपेक्षा अधिक आहे.