जयपूर : गेल्या वर्षी मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलींच्या संदर्भात मुसलमानांविरुद्धचे आपले वादग्रस्त वक्तव्य हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून विहिंपचे पदाधिकारी प्रवीण तोगडिया यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम राहणार असल्याचे प्रतिपादन केले.
येथे पिंक सिटी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी, आम्हाला जे सांगायचे होते ते आम्ही विचारपूर्वक सांगितले आहे. आमच्या सांगण्यामागचा अर्थ स्पष्ट आहे की, भारतात हिंदूंना कोणी हात लावू शकत नाही. अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूवर एकही दगड आला तर देशातील हिंदू गप्प राहणार नाहीत. मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. ज्यांना जे सांगायचे होते ते सांगितले आहे असे ते म्हणाले.
तोगडिया यांनी, जर अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला झाला, तर हिंदू शांत बसणार नाहीत असे म्हणून मी कुणाला हिंसेकरिता प्रवृत्त केलेले नाही. मुजफ्फरनगरमध्ये मागील वर्षी हिंदू मुलींवर झालेल्या दुष्कर्माच्या घटना, अलीकडेच झालेले अमरनाथ यात्रेकरूंवरचे हल्ले व 2क्क्2 मध्ये गोध्रा रेल्वेस्थानकावर मारण्यात आलेले 57 नागरिक यामुळे जो ताण वाढला आहे, त्यामुळे या देशातील हिंदू सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होत असल्याचेही ते यावेळी म्हटले. (वृत्तसंस्था)