शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिरासाठी विहिंप आग्रही

By admin | Updated: September 3, 2015 02:29 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या दिल्लीतील समन्वय बैठकीच्या पहिल्याच दिवशी विश्व हिंदू परिषदेने अयोध्येच्या राममंदिराचा जुनाच मुद्दा पुन्हा अधोरेखित केला.

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या दिल्लीतील समन्वय बैठकीच्या पहिल्याच दिवशी विश्व हिंदू परिषदेने अयोध्येच्या राममंदिराचा जुनाच मुद्दा पुन्हा अधोरेखित केला. राममंदिराबाबत देशात संभ्रमाचे वातावरण आहे. केंद्राने सकारात्मक पावले उचलून हा संभ्रम लवकरात लवकर दूर केला पाहिजे, अशी विहिंपची प्रमुख मागणी आहे. दिल्लीत वसंत कुंज येथील मध्यांचल भवनात सलग तीन दिवस चालणाऱ्या या समन्वय बैठकीच्या पहिल्या दिवशी सरकार व पक्षातर्फे गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेरच्या दिवशी या बैठकीत सहभागी होणार आहेत. पक्षाच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य व ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची बैठकीतली गैरहजेरी मात्र लक्षवेधी ठरली. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघ आणि भाजपाची ही बैठक अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. ही बैठक मोदी सरकारच्या कामकाजाची चिकित्सा करण्यासाठी नाही, तर मुक्त चर्चेव्दारे सरकारच्या लोकप्रियतेपासून धोरणांबाबत मंथन करण्याचा इरादा त्यामागे आहे. मुख्यत्वे सामाजिक विषयांवरच बैठकीत विचारविनिमय होईल, असे वारंवार सांगण्यात आले तरी विरोधकांच्या मते संघातर्फे एकप्रकारे मोदी सरकारचे हे वार्षिक मूल्यमापनच आहे. संघाचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य पत्रकारांना म्हणाले, प्रतिवर्षी सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यात अशा बैठकांचे नियमितपणे आयोजन केले जाते. गतवर्षी लुधियाना व दिल्ली येथे अशा बैठका झाल्या. यंदाच्या दिल्लीतील तीन दिवसांच्या समन्वय बैठकीत संघाचे ९०३ प्रमुख पदाधिकारी, स्वयंसेवक व प्रचारक सहभागी आहेत. याखेरीज संघ परिवाराच्या १५ संघटनांचे प्रतिनिधी विविध प्रश्नांबाबत आपल्या लिखित मतांचे आदान प्रदान करतील. त्यात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विषयांचा समावेश असेल. केंद्र सरकारच्या प्रमुख मंत्र्यांना या बैठकीत निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत अर्थ व कृषी विषयक प्रश्नांवरही चर्चा अपेक्षित आहे.