पशुवैद्यकीय अधिकार्यांचे निवासस्थान मोडकळीस
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
तळेगाव ढमढेरे : येथील पशुवैद्यकीय अधिकारी मुक्कामी निवासस्थान मोडकळीस आले आहे.
पशुवैद्यकीय अधिकार्यांचे निवासस्थान मोडकळीस
तळेगाव ढमढेरे : येथील पशुवैद्यकीय अधिकारी मुक्कामी निवासस्थान मोडकळीस आले आहे.तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथ पशुवैद्यकीय दवाखाना असून शेजारीच पशुधन विकास अधिकार्यांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थान आहे. हे निवासस्थान गेल्या आठ वर्षांपासून मोडकळीस आल्याने येथे पशुधन अधिकारी निवासस्थानी राहत नाहीत. त्यामुळे रात्री-अपरात्री जनावरे आजारी पडल्यानंतर उपचारासाठी आणता येत नाहीत. गोपालकांची गैरसोय होत आहे. तळेगाव ढमढेरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत तळेगाव ढमढेरे, धानोरे, शिक्रापूर, सणसवाडी, शिवतक्रार म्हाळुंगी, राऊतवाडी, बुरुंजवाडी, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, कासारी, दरेकरवाडी या ११ गावांचा समावेश आहे.हे निवासस्थान मोडकळीस आल्याने येथे अधिकारीवर्ग कोणीही राहत नाही. त्यामुळे बाजूला गवत-झुडपांची या इमारतीभोवती वाढ झाल्याने या अधिकार्यांच्या निवासस्थानाला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ही मोडकळीस आलेली इमारत पाडून नवीन इमारत बांधावी, अशी गोपालक शेतकरी मागणी करीत आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर प्रशासकीय अधिकार्यांनी भेटी दिल्या. मात्र या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे.११ गावांमध्ये पशुजनगणनेनुसार आठ हजार जनावरे व ३ हजार शेळ्या-मेंढ्या आहेत. शेतीला जोडधंदा दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात बागायती प्यात असल्याने जर्सी गायींची संख्या जास्त आहे. वातावरणातील बदलामुळे व क्षारयुक्त पाण्यामुळे या जनावरांमध्ये आजाराचे प्रमाण जास्त आहे. या जनावरांच्या किमतीही जास्त आहेत. अशी जनावरे रात्री-अपरात्री आजारी पडल्यानंतर उपचार मिळत नाहीत. ०००००