शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

व्हीव्हीपॅटची पडताळणी मतमोजणीच्या आधी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 06:31 IST

विरोधी पक्षांची मागणी : तफावत आढळल्यास सर्व मते तपासा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची येत्या गुरुवारी मतमोजणी करताना मतदानयंत्रांमधील मतांची मोजणी करण्याआधी व्हीव्हीपॅट पडताळणी केली जावी आणि यात एका जरी मतात तफावत आढळली, तर त्या विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदानयंत्रांमधील मतांची व्हीव्हीपॅट पडताळणी करून नंतरच मतमोजणी सुरू केली जावी, अशी मागणी २२ विरोधी पक्षांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे केली.

पुन्हा ‘रालोआ’चे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता वर्तविणारे एक्झिट पोलचे अंदाज व देशाच्या मतदानयंत्रे स्ट्राँगरूममधून अन्यत्र हलविली गेल्याच्या कथित बातम्यांवरून निर्माण झालेले शंकेचे वातावरण, यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांची सकाळी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेत रणनीतीची आखणी केली. त्यानंतर, या पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले.

आयोगाकडे वरीलप्रमाणे मागणी केल्याचे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आम्ही सातत्याने आयोगाकडे हीच मागणी करीत आहोत. बुधवारी बैठक घेऊन यावर विचार करू, असे आयोगाने सांगितले. तृणमूलच्या शिष्टमंडळानेही आयोगाची भेटघेऊन भाजपने राज्यात घातलेल्या गोंधळाच्या तक्रारी केल्या.

आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले की, मतदारांनी जो कौल दिला आहे, त्याचा आदर केला जायला हवा. त्यात कोणतीही गडबड होण्याची शक्यता राहू देऊ नये, एवढाच आमचा आग्रह आहे.

सकाळच्या बैठकीत काँग्रेसतर्फे अहमद पटेल, गुलाम नबी आझाद व अशोक गेहलोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, बसपचे सतीशचंद्र मिश्रा, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूलचे डेरेक ओ’ब्रायन, सपचे रामगोपाल यादव, द्रमुकच्या कणिमोळी, राजदचे मनोज झा यांच्यासह १९ पक्षांचे नेते सहभागी झाले होते.भाजपला बहुमत अशक्यच : विरोधकविरोधकांच्या बैठकीतही संभाव्य निकाल आणि त्यानंतर उचलावयाची पावले याबाबत चर्चा झाली. बहुसंख्य नेत्यांनी एक्झिट पोलवर आपला विश्वास नसल्याचे सांगितले, तसेच मतमोजणीच्या वेळी आपल्या कार्यकर्त्यांना अधिक काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. भाजप व रालोआला बहुमत मिळणार नाहीत, असा दावा बहुसंख्य नेत्यांनी केला.

ईव्हीएमची वाहतूक आता कशासाठी?शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी संपल्यानंतर सर्व ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये पाठविण्यात आली. तिथे ती बंदिस्त असून, त्या ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान तैनात असून, विविध पक्षांचे कार्यकर्तेही तळ ठोकून आहेत.असे असताना उत्तर प्रदेश व बिहारमध्ये गेले दोन दिवस वाहनांतून ईव्हीएमची वाहतूक सुरू होती. त्यापैकी काही ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये नेल्यामुळे या यंत्रांमध्ये काही तरी गडबड असल्याची शंका विरोधी कार्यकर्ते व नेते करीत आहेत.केंद्रातील सत्ताधारी पक्षाला, त्या यंत्रांवर मतदान करून ती नेली असावीत, असा विरोधकांचा संशय आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९