शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या, डाळी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पालेभाज्यांसह डाळींच्या भावाची गगनाला गवसणी

By admin | Updated: May 22, 2015 00:32 IST

रमेश शिंदे, औसा : मागील वर्षीच्या कमी पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पावसाअभावी भीषण पाणीटंचाई जाणवत असली तरी आता हे कमी पावसाचे लोण आता गोर गरीबांच्या चुलीपर्यंत येऊन ठेपले आहे. पावसाअभावी डाळवर्गीय शेती मालाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले, तर आता पाण्याअभावी भाजीपाला उत्पादनातही मोठी घट झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. भाज्या आणि डाळी दोन्हींचेही भाव आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

रमेश शिंदे, औसा : मागील वर्षीच्या कमी पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पावसाअभावी भीषण पाणीटंचाई जाणवत असली तरी आता हे कमी पावसाचे लोण आता गोर गरीबांच्या चुलीपर्यंत येऊन ठेपले आहे. पावसाअभावी डाळवर्गीय शेती मालाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले, तर आता पाण्याअभावी भाजीपाला उत्पादनातही मोठी घट झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. भाज्या आणि डाळी दोन्हींचेही भाव आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. औसा तालुका हा तसा खरीप हंगामाचा तालुका असून, तुरीचे उत्पादन तालुक्यात बर्‍यापैकी घेतले जाते. मागील वर्षी खरीप हंगामातील पेरण्यासाठी तब्बल एक महिना उशिराने पाऊस झाला. त्यामुळे तुरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. १ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असली, तरी केवळ १६ हजार हेक्टरवरच तुरीचे पीक होते. उडीद, मुगाची तर मागच्या वर्षी अल्प प्रमाणातच पेरणी झाली होती. रबी हंगामासाठी पाऊसच न झाल्याने हरभराही अल्प प्रमाणातच पेरला गेला. त्यामुळे यावर्षी तूर, मूग, उडीद व हरभरा या सर्वच डाळींच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तर पाणीच नसल्यामुळे यावर्षी भाजीपालाही नाही. शेतकर्‍यांकडे शेतीमध्ये जे काही उत्पादन निघेल, त्यामधील काही हिस्सा शेतकरी घरी ठेवत असतो. प्रत्येक वर्षी त्यामुळे शेतकर्‍यांकडे तूर, हरभरा आणि मूग या डाळी घरच्या असतात. पण यावर्षी मात्र या तीनही डाळवर्गीय पिकांचे उत्पादनच नसल्यामुळे आता शेतकर्‍यांच्या घरीही डाळी नाहीत, तर शेतकरी विहिरी, बोअरना असलेल्या पाण्यावर शेतामध्ये भाजीपाल्यांची लागवड करीत. पण विहिरी-बोअर यावर्षी हिवाळ्यातच आटल्यामुळे भाजीपालाही नाही, अशी अवस्था झाल्यामुळे आता गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तूरडाळीने शंभरी ओलांडली, तर हरभरा, मूग या डाळीही ७० ते ९० रुपये किलो या दरापर्यंत गेल्या आहेत. तर भाजीपालाही २० रुपयांपासून ८० ते १०० रुपये किलोपर्यंत गेल्या आहेत.या संदर्भात बोलताना भाजीपाल्याचे कमिशन एजंट व आडते बाळू माळी म्हणााले की, आडतीवरच भाजीपाला येईनासा झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याला चांगला भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात भाजीपाला घ्यावा कसा आणि विकावा कसा, असा प्रश्न पडला आहे. पण सध्या ज्या शेतकर्‍यांकडे भाजीपाला आहे ते मात्र फायद्यात आहेत, असे सांगितले.