शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या, दुधात कीटकनाशके

By admin | Updated: October 3, 2015 03:56 IST

सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सेवन होणाऱ्या भाज्या, फळे, दूध या आणि अशा काही महत्त्वाच्या पदार्थांत शरीरास घातक ठरेल अशा मात्रेत कीटकनाशके असल्याचे सरकारी तपासणीतच आढळून आले आहे.

नवी दिल्ली : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सेवन होणाऱ्या भाज्या, फळे, दूध या आणि अशा काही महत्त्वाच्या पदार्थांत शरीरास घातक ठरेल अशा मात्रेत कीटकनाशके असल्याचे सरकारी तपासणीतच आढळून आले आहे. तपासणी झालेल्या २०,६१८ नमुन्यांपैकी १२.५ टक्के नमुन्यांत कीटकनाशकांचे प्रमाण घातक पातळीवर असल्याचे उघड झाले आहे. खाद्यपदार्थांच्या निर्मिती व उत्पादनात आरोग्यवर्धक घटकांची मात्रा, रसायने अथवा कीटकनाशके यांची मात्र तपासण्यासाठी २००५ पासून सरकारतर्फे विविध खाद्यपदार्थांची नियमित तपासणी होत आहे. या तपासणीकरिता देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून सरसकट भाज्या, फळे, कडधान्ये, दूध व अन्य खाद्यपदार्थांचे नमुने गोळा केले जातात व देशभरातील २५ प्रयोगशाळांतून या पदार्थांचा दर्जा व त्यातील रसायने यांची तपासणी केली जाते. त्यावेळी या पदार्थांत कीटकनाशकांची मात्रा अधिक असल्याचे आढळून आले. जमा केलेल्या भाज्यांच्या ११८०, फळांच्या २२५, मसाल्याच्या ७३२, तांदळाच्या ३०, डाळीच्या ४३ नमुन्यांत अशी धोकादायक कीटकनाशके सापडली. भाज्यांमध्ये अ‍ॅसिफेट, ट्रायोजोसेफ, मॅटेलोक्लीझ ही कीटकनाशके सापडली. फळांमध्ये अ‍ॅसिफेट, अ‍ॅसिटामीप्रेड, कार्बो सल्फान, सायपरमेथ्रीन, प्रोफेनोफेस आदी सापडले.बंदी असलेल्या अनेक कीटकनाशकांचाही वापर असल्याचे दिसून आले आहे. या नमुन्यात अ‍ॅसिफेट, बाइफ्रेंथिन, अ‍ॅसिटामीप्रेड, ट्रायोजोसेफ, मॅटेलोक्लीझ, मेलेथियन, कार्बो सल्फान, प्रोफेनोफेस, एक्साकोनाजेन आदींचे अंश सापडले. या रसायनांची अतिरिक्त मात्रा शरीरासाठी हानिकारक आहे. तर कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे, की सुमारे ५४३ नमुन्यांत २.६ टक्क्यांच्या विहित मर्यादेपेक्षा कित्येक पटीने कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे.