शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला निर्यातीत दीड हजार टनाची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 04:40 IST

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातून यंदा भाजीपाला आणि फळांची निर्यात दीड हजार टनांनी वाढली असून, देशांतर्गत विक्रीतही एक ...

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातून यंदा भाजीपाला आणि फळांची निर्यात दीड हजार टनांनी वाढली असून, देशांतर्गत विक्रीतही एक हजार टनांनी वाढ झाली आहे. त्यातून ४९.४७ कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

राज्यातील फळे व भाजीपाल्यास देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पणन मंडळाच्या मार्फत ४४ सुविधा केंदे्र उभारली आहेत. त्या माध्यमातून द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, संत्रा, कांदा, भेंडी, कारले, शेवगा, तोंडली, मिरची यासारख्या भाजीपाल्याची निर्यात करण्यात आली. निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, सहकारी संस्था, बाजार समित्या, वैयक्तीक शेतकऱ्यांच्या मार्फत ही सुविधा केंद्र चालविली जातात. काही निर्यात केंद्रे पणन मंडळ स्वत: संचालित करते. एप्रिल ते जून २०१८च्या तुलनेत एप्रिल ते जून २०१९ मध्ये तब्बल १५१५.६ टन जादा शेतमालाची निर्यात झाली आहे.

अमेरिका, जपान, कॅनडा, जर्मनी, युरोपीयन देश, नेदरलँड, रशिया, थायलंड, कॅनडा, न्यूझीलंड, इंग्लंड, सिंगापूर, चीन, नेपाळ, इराण आणि दुबई या देशांना शेतमाल निर्यात करण्यात आला. त्यात आंबा, द्राक्ष, डाळिंब, केळी, भाजीपाला, फळे, गुलाब फुले, पशुखाद्य आणि कांद्याचा समावेश आहे. तर, परराज्यात बटाटा, गुलाब फुले, कांदा, केळी, डाळिंब, आंबा, कारले, मिरची, दोडका, भेंडी, पालक, हळद अशा विविध प्रकारच्या शेतमालांची विक्री केली आहे. राज्यांतर्गत बाजारपेठेत प्रामुख्याने मुंबई, पुणे, ठाणे, दिल्ली, सांगली, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर बाजारात मोठ्या प्रमाणावर शेतमाल पाठविण्यात येतो.शेतकरी झाले निर्यातदारपणन मंडळामार्फत निर्यातपूरक उपक्रमांमधे वाढ व्हावी व युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यावसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ‘हॉर्टीकल्चर एक्स्पोर्ट ट्रेनिंग कोर्स’ डिसेंबर २०१५पासून सुरु करण्यात आला आहे. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी, सहकारी संस्था प्रतिनिधी, नवीन उद्योजक यांना निर्यातविषयक प्रशिक्षण दिले जाते. आजतागायत ४६ प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून १ हजार १०३ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यात आले असून, त्यातील १०५ जणांनी प्रत्यक्ष निर्यात सुरू केली आहे. तर, १८० प्रशिक्षणार्थींनी शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांच्या माध्यमातून कृषी उत्पादनाच्या पुरवठासाखळीची जबाबदारी पार पाडत आहेत.