वास्कोत कला प्रदर्शन व सूत्रसंचालन शिबिर
By admin | Updated: May 18, 2015 01:16 IST
वास्को : रवींद्र भवन बायणा वास्कोतर्फे दि़ २४ ते २८ मे दरम्यान कला प्रदर्शन व कला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. २५ व २६ रोजी मुंबई येथील जे़ जे़ स्कूल ऑफ आर्ट्सचे मनोवराज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पेंटिंग कार्यशाळा घेण्यात येईल़ या कार्यशाळेसाठी रवींद्र भवनतर्फे चित्रकलेची पेपरची व्यवस्था करण्यात येईल़ तर इतर साहित्य सहभागी होऊ इच्छिणार्यांनी आणावे़ कार्यशाळेत प्रथम नावनोंदणी तत्त्वावर फक्त २५ जणांना प्रवेश दिला जाईल. ही कार्यशाळा ९ ते १५ वर्षे, १६ ते २५ वर्षे आणि २६ वर्षांवरील गटांसाठी असेल. स्पर्धा दि. २८ रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत घेण्यात येईल़ प्रत्येक गटातील विजेत्यांना रु. १००० हजारांचे बक्षीस दिले जाईल़
वास्कोत कला प्रदर्शन व सूत्रसंचालन शिबिर
वास्को : रवींद्र भवन बायणा वास्कोतर्फे दि़ २४ ते २८ मे दरम्यान कला प्रदर्शन व कला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. २५ व २६ रोजी मुंबई येथील जे़ जे़ स्कूल ऑफ आर्ट्सचे मनोवराज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पेंटिंग कार्यशाळा घेण्यात येईल़ या कार्यशाळेसाठी रवींद्र भवनतर्फे चित्रकलेची पेपरची व्यवस्था करण्यात येईल़ तर इतर साहित्य सहभागी होऊ इच्छिणार्यांनी आणावे़ कार्यशाळेत प्रथम नावनोंदणी तत्त्वावर फक्त २५ जणांना प्रवेश दिला जाईल. ही कार्यशाळा ९ ते १५ वर्षे, १६ ते २५ वर्षे आणि २६ वर्षांवरील गटांसाठी असेल. स्पर्धा दि. २८ रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत घेण्यात येईल़ प्रत्येक गटातील विजेत्यांना रु. १००० हजारांचे बक्षीस दिले जाईल़ तसेच दि़ २५ ते २७ मे पर्यंत सूत्रसंचालनाच्या शिबिराचा कार्यक्रम होणार आहे़ हे शिबिर कोकणी व मराठीमध्ये होणार आहे. अनंत अग्नी व प्रसिध्द सूत्रसंचालक रवींद्र खारे (पुणे) हे उपस्थित असतील़ इच्छुकांनी दि़ २२ मेपर्यंत अर्ज रवींद्र भवन बायणा, वास्को येथे सादर करावेत़ अधिक माहितीसाठी वास्को येथील रवींद्र भवन बायणा कार्यालयात संपर्क साधावा. (प्रतिनिधी)