वासनकर घोटाळा, सुनावणी तहकूब
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
नागपूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकरची पत्नी भाग्यश्री, सासू कुमुद जयंत चौधरी व भाऊ विनयची पत्नी मिथिला यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केले आहेत. शासनाने उत्तरासाठी वेळ मागितल्यामुळे शुक्रवारी याप्रकरणावरील सुनावणी १२ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. तिन्ही आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळालेला असून हा आदेश पुढे लागू राहणार आहे.