शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

फरकांडे ग्रामपंचायतीची विविध विकास कामे मार्गी -सरपंच

By admin | Updated: April 20, 2015 13:08 IST

ग्रामपंचायतीने विविध विकास कामे मार्गी लावल्याचे सरपंच जयश्री राजेंद्र ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

फरकांडे, ता.एरंडोल : ग्रामपंचायतीने विविध विकास कामे मार्गी लावल्याचे सरपंच जयश्री राजेंद्र ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.गावात तत्कालीन आमदार चिमणराव पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीतून ४ लाख ६८ हजार रुपये व्यायाम शाळेसाठी मंजूर केले होते. हे काम नुकतेच पूर्ण झाले. तेराव्या वित्त आयोगातून दोन मुतार्‍या, सात ढापे, ग्रा.पं.चे वॉल कंपाऊंड, ग्रामसभेसाठी मोठे सभागृह, इमारतीचे नूतनीकरण (सुशोभिकरण) करण्यात आले आहे. जि.प.च्या चौक सुशोभिकरण योजनेत एक हायमास्क लॅम्प मंजूर करून तो जयशिवराय चौकात लावला आहे. विद्यमान आमदार डॉ.सतीश पाटील यांनी आमदार निधीतून तीन हायमास्ट लॅम्प मंजूर केले असून ते लवकरच मुख्य चौकात लावण्यात येणार आहेत. राहिलेल्या भागाचे काँक्रिटीकरणासाठी खासदार फंडातून निधी मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत, असे शेवटी सरपंच यांनी सांगितले. एका महिला सरपंचाकडून गावाच्या विकासाची कामे सुरू असल्याने गावात समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करा - लीलाताई पाटीलपळासखेडे बुद्रुक, ता.जामनेर : राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार या विधायक अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या शिवारात पाणी अडणार आहे. याचा फायदा गावानाच होणार आहे. त्यामुळे ज्या गावात हे अभियान राबविले जात आहे त्या गावातील ग्रामस्थांनी अभियान आपलेच आहे, असे समजून त्यात जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पंचायत समिती सदस्य लीलाबाई प्रकाश पाटील यांनी हिवरखेडे बुद्रुक येथे केले.जलयुक्त शिवार या अभियानाचा जिल्‘ात प्रचार प्रसार आणि जनजागृती करण्यासाठी कृषी व महसूल विभागामार्फत हिवरखेडे बुद्रुक येथे आलेल्या मोबाईल व्हॅन प्रचार दिंडीचे उद्घाटन लीला पाटील यांच्या हस्ते झाले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाणी आडवा पाणी जिरवा, विहीर पुर्नभरण, नवीन सिमेंट बांध बांधणे, जुने बांध खोलीकरण करणे याबाबत मंडळ अधिकारी तळेले यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यावेळी सरपंच मंगलाबाई संभाजी पाटील, उपसरपंच अरुण चौधरी, ग्रामसेवक योेगेश पालवे, कृषी सहाय्यक के.के. शिवदे, एस.एन. सावळे, प्रवीण सपकाळे, राजू पाटील, दीपक करवंदे, अमर पाटील, जितेंद्र पाटील, बाळू पाटील, वैभव महाजन, दिनेश धोबी यांच्यासह शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)