शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

वैदिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

By admin | Updated: July 16, 2014 18:02 IST

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याची भेट घेणारे ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन टीम 
इंदोर, दि. १६ - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याची भेट घेणारे ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
वैदिक यांच्याविरोधात इंदोर आणि वाराणसीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याची सुनावणी येत्या २५ जुलैपर्यंत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वैदिक यांनी हाफिज सईद याची भेट घेतल्यापासून देशभर त्यांच्याविरोधात चौफेर हल्ला चढविला जात आहे. काही हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांनी वैदिक यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलेला असतानाच महाराष्ट्रात मात्र, शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाने त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.  अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पाकमध्ये जाऊन दहशतवाद्यांच्या म्होरक्याला भेटणा-यांना चटके द्यायला पाहिजे असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. वैदिक यांच्याविरोधात काँग्रेसही आक्रमक झाली असून त्यांच्याविरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलने चालवली आहेत.